‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील 'मै झुकेगा नही साला' हा डायलॉग खूप फेमस झाला होता. अनेक लोकांनी या डायलॉगवर वेगवेगळी रील केल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील यात शंका नाही. पण या डायलॉग म्हणत एका आरोपीने सर्वांसमोर गुन्हा कबूल केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय की, मी खून करायला गेलो होतो पण खून करू शकलो नाही आणि त्यानंतर तो मी झुकणार नाही हा पुष्पा सिनेमातील डायलॉग म्हणतो. "मला चोर म्हणू नका." मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या गाडीत बसलेल्या आरोपीला जेव्हा मीडियावाले काही प्रश्न विचारतात तेव्हा तो म्हणतो, "मी काल खून करायला गेलो होतो पण मी तो केला नाही. मला चोर म्हणू नका मी चोरी करत नाही तर हिसकावून खातो" तसंच, माझं नाव पुष्पा आहे, मी झुकणार नाही असंही तो म्हणाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर या आरोपीला एका चोरीच्या घटनेत सहभागी असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलिसांच्या गाडीत बसून तो जो डायलॉग म्हणला आहे त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेही पाहा- पुलावर फोटो काढण्यासाठी गेली मुलं, अचानक रेल्वे आल्यामुळे मारल्या उड्या…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया - या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले की, "या व्हिडीओवरुन तुम्ही पश्चिम बंगालमधील परिस्थिती काय आहे याची कल्पना करू शकता." तर दुसऱ्याने लिहिलं, "आजचे गुन्हेगारही चित्रपटांमधून प्रेरणा घेत आहेत." तर पोलिसांनी लाखोंच्या चोरीच्या आरोपाखाली या गुन्हेगाराला केल्याचे सांगितलं जात आहे. तसेच या आरोपीला सिलीगुडी कोर्टात हजर करायचे होते. या आरोपीचे नाव मोहम्मद अफजल असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर २० सप्टेंबर रोजी माटीगरा येथील न्यू कॉलनी भागातील एका व्यक्तीच्या घरात चोरीचा आरोप आहे. अफजलकडून अनेक महागड्या वस्तू जप्त केल्याचंही सांगितलं जात आहे.