विमानातून प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कधी सीट नादुरुस्त असतात तर कधी जेवण ठीक नसते, मात्र कतार एअरवेजच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा एका समस्येला सामोरे जावे लागले, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. विमानातील एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले, अशा परिस्थितीत काही प्रवासी तर बेशुद्ध पडले, तर अनेक जण कपडे काढून विमानात फिरत होते. ग्रीसच्या अथेन्सहून दोहाला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रवाशांना तीन तासांपेक्षा जास्त काळ तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. घामामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी भरविमानात कपडे काढले. अनेक प्रवासी उष्णता सहन न झाल्याने चक्क बेशुद्ध पडले. दरम्यान, स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट गार्थ कॉलिन्स याने फ्लाइटमधील थाई फायटर डेमियन कॉलिन्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये डेमियनही मोठ्या प्रमाणात घामाने भिजलेला दिसत आहे; तर त्याच्या मागे उभे असलेले लोक मिळेल त्या वस्तूने स्वत:ला हवा घालताना दिसतायत. लोक स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा सतत प्रयत्न करत होते.

shocking video while crossing the river a man foot fell on a dangerous fish stingray
बापरे! नदी ओलांडताना दगड समजून ठेवला प्राण्यावर पाय अन् पुढे जे घडलं ते फारच भयानक; पाहा video
Train Couple Intimate
हा तर निर्लज्जपणाचा कळस! धावत्या ट्रेनमध्ये कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की..; VIDEO व्हायरल
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Snake Slid Inside Man's Pants While enjoying in waterfall shocking video
धबधब्यात भिजायला जाताय? थांबा! तरुणासोबत काय घडलं पाहा; VIDEO पाहून थरकाप उडेल
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे

लैंगिक संबंधांतून वेगाने पसरतोय ‘हा’ नवा दुर्मीळ आजार; कोणाला अधिक धोका? जाणून घ्या लक्षणे

गार्थने डेमियनचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘डेमियन कॉलिन्स, जेव्हा @qatarairways फ्लाइट QR204 चे दरवाजे ३.५ तास बंद असतात, एअर कूलिंग नव्हते आणि खाण्यासाठी काहीही नव्हते तेव्हा लोक बाहेर पळण्यासाठी प्रयत्न करत होते, लोक घाबरले होते. डेमियन हा एक तंदुरुस्त प्रशिक्षित खेळाडू आहे, त्याची जर ही स्थिती आहे, तर कोणत्याही सामान्य व्यक्तीला यामुळे किती त्रास झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. यावेळी प्रवासी विमानातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी ओरडत होते.

धक्कादायक! भररस्त्यात महिलेचा तोंड दाबून विनयभंग अन् मदतीसाठी ओरडताच…; घटनेचा video व्हायरल

गार्थ कॉलिन्सच्या म्हणण्यानुसार, विमानातील दुसऱ्या व्हिडीओमध्ये लोक उष्णतेशी झुंजताना आणि इन्फ्लाइट मॅगझिनच्या मदतीने स्वत:ला हवा घालताना दिसत आहेत. द मिररच्या वृत्तानुसार, प्रवाशांना विमानातून बाहेर पडण्यास आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्यासाठी अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल इमारतीत परत येण्यास सांगण्यात आले. या घटनेवर कतार एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘सोमवार १० जून २०२४ रोजी अथेन्स (एटीएच) ते दोहा (डीओएच) फ्लाइट क्रमांक QR204 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कतार एअरवेज माफी मागते, ती स्थिती तांत्रिक समस्येमुळे घडली.