Viral Video: राफेल नदाल विरोधात खेळले ९७ वर्षीय आजोबा, नंतर असा रंगला सामना…

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो…हे पटवून देणारा हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

Rafael-nadal-playing-with-97-yr-old

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो आणि ज्यावेळी वेळ येते तेव्हा कधीही उशिर झालेला नसतो, ती योग्य वेळ असते. ९० च्या दशकातील एका टेनिसपटूने २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालसोबत खेळून हे सिद्ध केलंय. लाल मातीचा बादशाह राफेल नदालसोबत या ९७ वर्षीय खेळाडूसोबत रंगलेल्या या खेळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरील नेटिझन्सचं मन पिघळून जात आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पाहून भावूक व्हाल.

टेनिसच्या क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्याला ओळखलं जातं अशा २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. आजही त्याला भेटण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात. ग्रँड स्लॅम असो वा इतर कोणता सामना अनेकदा क्ले कोर्ट फॅन्सनी दुथडी भरून वाहत होत्या. संपूर्ण कोर्ट ‘नदाल नदाल नदाल’ याच नावाने दुमदुमून जात होते. राफेल नदालची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. लहान्यांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वत्र नदालच्या फॅन्सचं जाळं पसरलं आहे. याचमुळे सोशल मीडियात राफेल नादलचे वेगवेगळे व्हिडीओ लगेच व्हायरल होत असतात. नुकताच एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्याच्या स्वभावामुळेही टेनिसप्रेमींना त्याची भूरळ पडली आहे. अजुनही राफेल त्याच्या चाहत्यांना विसरला नाही.

एका ९७ वर्षीय चाहत्याचे स्वप्न राफेलने पूर्ण केलं आहे. ९७ वर्षीय टेनिस खेळाडू नुकतंच राफा नदाल अकादमीमध्ये राफेलच्या भेटीसाठी आले होते. युक्रेनियन खेळाडू लिओनिड स्टॅनिस्लावस्की असं या चाहत्याचं नाव असून आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF)चे जगातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या चाहत्याच्या नावावर आहे. लाल मातीचा राजा राफेल नदालसोबत एकदा तरी खेळण्याचं स्वप्न या ९७ वर्षीय खेळाडूने पाहिलं होतं.

९७ वर्षीय खेळाडू लिओनिड स्टॅनिस्लाव्स्की यांनी यापूर्वी त्याच्या गावी मॅनाकोर इथे स्पेनियार्डद्वारे चालवल्या जाणार्‍या टेनिस अकादमीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर या ९७ वर्षीय स्टॅनिस्लाव्स्की यांनी राफेल नदालची भेट घेतली आणि खेळावरील प्रेमाची देवाणघेवाण केली. पण या चाहत्याने केवळ भेटच घेतली नाही तर राफेलसोबत खेळण्याचं स्वप्न देखील पूर्ण केलं. स्टॅनिस्लावस्की यांचं वय असूनही कोर्टमध्ये सुरेख चेंडू मारून आपल्या आवडत्या खेळाडूसोबत खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला. Rafa Nadal Academy by Movistar या ट्विटर हॅंडलवरून या सुंदर सामन्याचे काही फोटोज आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या खेळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील लोक ९७ वर्षीय खेळाडूच्या चेहऱ्यावरील गोड हावभाव आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद पाहून भावूक होत आहेत. वयाची साठी ओलांडली की अनेक आपले हातपाय थकले असल्याचं सांगत अंथरूण धरताना दिसून येतात. पण काही वर्षांनी शंभरी गाठणाऱ्या या आजोबांचं कौशल्य आणि उत्साह पाहून नेटिझन्स प्रभावित झाले आहेत. ९७ वर्षीय खेळाडू लिओनिड स्टॅनिस्लाव्स्की यांची जिद्द पाहून त्यांचं भरभरून कौतूक करण्यात येत आहे.

या व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर सर्वत्र या ९७ वर्षीय टेनिसपटू आजोबांचीच चर्चा होऊ लागली आहे. वय हा फक्त आकडा असतो. पण एखाद्या गोष्टी विषयची वेड तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातं, हे या व्हायरल व्हिडीओवरून दिसून येतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rafael nadal plays an adorable point against a 97 year old tennis player leonid stanislavskyi trending globally viral video social media prp