माणुसकी म्हणजे काय? असा प्रश्न विचारला तरी प्रत्येकजण त्याची वेगळी व्याख्या देईल. सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर निस्वार्थ भावनेने केलेली मदत म्हणजे माणुसकी मग ती कोणाचीही असो. आजच्या धावपळीच्या जगात लोकांना स्वत:च्या आयुष्यात इतके गुरफटलेले असतात की त्यांना आसापास काय घडतं आहे याचे भानही नसते. एखाद्याला मदतीची गरज असेल तरी लोक दुर्लक्ष करून जातात अशा काळात संकटात सापडलेल्याच्या मदतीला धावणारे मोजकेच लोक असतात जे खऱ्या अर्थाने माणुसकी जीवंत ठेवतात. माणुसकी हा मानवाचा सर्वांत मोठा धर्म आहे, हे नुकत्याच घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माकड नदीच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे पण राफ्टिंग टीमने त्या माकडाचा जीव वाचवला आहे. या घडनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रिव्हर राफ्टिंग हा एक साहसी खेळ आहे ज्याने तरुणाईला वेड लावले आहे. प्रंचड वेगाने खळखळ वाहणाऱ्या नदीतच्या प्रवाहावर छोट्याशा बोटीत बसून या खेळाचा आनंद घेतला जातो. बोट वल्हवत, पाणी कापत पाण्याच्या प्रवाहावर हिंदोळे घेत बोट पुढे जात राहते. जस जसा पाण्याचा जोर वाढतो तस तसा साहसी खेळाची मज्जा आणखी वाढत जाते. सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट दिले जातात त्यामुळे पाण्यात पडल्यास बुडण्याचा धोका नसतो. अशाच प्रकारे रिव्हर राफ्टिंग आनंद घेणाऱ्या एका टीमबरोबर असे काही घडले ज्याची त्यांनी कल्पनी केली नव्हती.
व्हिडीओमध्ये दिसते की, रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेत असताना एका बोटी समोरून एक माकड नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाताना दिसते जे पाहून सर्वजण थक्क होतात. काहींना वाटते तो पाण्यात बुडत आहेत तेव्हा एकजण म्हणतो की, काही करू नको. तो पोहत जाईल. माकड बोटी जवळून जाते तेव्हा ते पाण्यात पोहत असल्याचे दिसते पण काही वेळानंतर माकड पुढे जाऊन एका ठिकाणी अडकते तेव्हा मात्र राफ्टिंग टीम त्याच्या मदतीला धावून जाते. व्हिडीओमध्ये दिसते की, एका दोरी टाकून माकडाला वाचवत आहे. माकडही दोरीचा आधार घेऊ स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतो. व्हिडीओमध्ये पुढे दिसते की, राफ्टिंग टीम माकडाला नदीच्या काठावर सोडते आणि आपल्या मार्गाने निघून जाते.
हा बचाव मोहीमेचा व्हिडीओ एक्स वर Nikhil Saini नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी राफ्टिंग टीमच्या कृतीचे कौतुक केले आहे.
पोस्टखालील कमेंट्स विभागात, दर्शकांनी बचावकार्यातील नाट्यमयतेपेक्षा त्यामागील हेतूवर अधिक चर्चा केली.
एका वापरकर्त्याने लिहिले, “पुढे धावणाऱ्या जगातही, माणुसकी एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी थांबते,” आणि या क्षणाला एरवीच्या घाईगडबडीच्या जगातील एक विराम म्हटले.
दुसऱ्याने कमेंट केली, “अशी दयाळूपणाची कृत्ये पाहून खूप आनंद होतो. त्या बिचाऱ्या प्राण्याला मदत करणाऱ्या टीमला देव आशीर्वाद देवो,” जे लोक सहजपणे पुढे जाऊ शकले असते, त्यांनी पुढे येऊन मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कौतुक व्यक्त केले.
अनेक वापरकर्त्यांनी हे देखील निदर्शनास आणले की, “व्हिडिओचे सौंदर्य केवळ बचावकार्यातच नव्हते, तर माकडाच्या मनात भीतीपासून विश्वासापर्यंत झालेल्या त्या क्षणिक बदलात होते.”
