scorecardresearch

‘Not An Airline’ असा बायो असणाऱ्या Vistara नावाच्या माहिलेला टॅग करून प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…

अभिनेता राहुल बोस हे सध्या आपल्या एका चुकीमुळे फार चर्चेत आले आहे. राहुल यांना विस्तारा एअरलाईन्सची सेवा आवडली नाही. याची तक्रार त्यांनी ट्विटर केली. मात्र, विस्ताराचे ट्विटर हँडल टॅग करण्याऐवजी त्यांनी भलत्याच व्यक्तीला टॅग केले आहे.

‘Not An Airline’ असा बायो असणाऱ्या Vistara नावाच्या माहिलेला टॅग करून प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…
अभिनेता राहुल बोस (pic credit – rahul bose/instagram )

अभिनेता राहुल बोस हे सध्या आपल्या एका चुकीमुळे फार चर्चेत आले आहे. राहुल यांना विस्तारा एअरलाईन्सची सेवा आवडली नाही. याची तक्रार त्यांनी ट्विटर केली. मात्र, विस्ताराचे ट्विटर हँडल टॅग करण्याऐवजी त्यांनी भलत्याच व्यक्तीला टॅग केले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर एकच हशा पिकला आहे.

राहुलने विस्तारा हे ट्विटर नाव असलेल्या एका महिलेला टॅग केले आहे. त्यामुळे राहुलच्या ट्विटवरील विस्तारा हे टॅग उघडल्यावर विस्तारा एअरलाईन्स ऐवजी या महिलेचे ट्विटर पेज उघडत आहे. विशेष म्हणजे, या महिलेने आपल्या नावाखाली नॉट अॅन एरलाईन असे देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे पेज उघडताच ‘नॉट अ‍ॅन एरलाईन’ असे वाचून नेटकरी पोट धरून हसत आहेत.

(Viral : चपळतेने एस्केलेटवर चढली मांजर, वरती पोहोचणार तितक्यात.. पाहा हा मजेदार व्हिडिओ)

ट्विटमध्ये राहुल यांनी ग्राउंड स्टाफ, बिझिनेस क्लास प्रवाशांना लाउंजमध्ये प्रवेश न मिळणे, आणि जेवण चांगले नसल्याची तक्रार केली आहे. आपण विस्ताराने ४ वेळा प्रवास केला. मात्र चारही वेळा एअरलाईने निराश केल्याचे ते म्हणाले.

नेटकरी म्हणाले, म्हणूनच विस्ताराचा..

राहुलच्या या चुकीची नेटकरी भरपूर मजा घेत आहे. एकाने ही चूक पाहून, म्हणून विस्ताराचा विस्तार होत नाहीये, अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने, तुम्ही चारही वेळा तीच विमानसेवा का वापरली असा प्रश्न केला आहे. तर एकाने चारही वेळा तिकिटीचे पैसे दिले नाही म्हणून हे झाले, अशी खिल्ली उडवली आहे.

दरम्यान विस्ताराने राहुल बोस यांना ट्विटरवर रिप्लाय दिला असून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. राहुल यांना झालेल्या त्रासाबद्दल विस्ताराने दुख व्यक्त केले आहे. सध्या अहमदाबाद विमातळासोबत लाउंज टायअप झालेले नाही, मात्र आवश्यक सुधारणा करण्यासाठी आम्ही सतत काम करत आहोत, असे विस्ताराने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या