Girl Reject Marriage Proposal Due To Rahul Gandhi : लग्न जमवणे हे आजच्या काळात दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे. अनेकदा चांगले स्थळ सापडते पण चांगली नोकरी किंवा दिसायला सुंदर नाही म्हणून अनेकांना नकार दिला जातो. आजकालच्या पिढीच्या लग्नाबाबतच्या, जोडीदाराबाबतच्या अपेक्षा फार बदलल्या आहेत. आता फक्त दिसणे, नोकरी महत्त्वाचे राहिले नाही. आजच्या पिढीला एकमेकांचे विचार पटणे देखील गरजेचे आहे. हा मुद्दा बरोबर देखील आहे. आयुष्याभर ज्या जोडीदाराबाबत राहायचे त्याच्याबरोबर आदर , विश्वास, संभाषण (Communication), ध्येय आणि मूल्ये (Goals and Values), पैसा, भावनिक साथ, व्यक्तिस्वातंत्र्य या गोष्टींवर विचार जुळायला पाहिजे. पण, राजकीय विचार प्रणालीवरही विचार जुळले पाहिजेत अशी अपेक्षा केली जाईल अशी अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल. पण नेमके असेच काहीसे एका तरुणाबाबत घडला. राजकीय विचारसरणी जुळत नसल्याने एक तरुणीने त्याला नकार दिल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल पोस्टनुसार एका तरुणीने विचित्र कारणामुळे एका तरुणाला नकार दिल्याचा धक्कादायक दावा केला आहे. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, तरुणाला ४० लाखांचे पॅकेज होते, तो दिसायला देखील देखणा होता पण तिने तरीही तिने त्याला नकार दिला. जेव्हा नकार देण्याचे कारण तिने सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. याच कारणामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
एका विचित्र कारणास्तव लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा एक अजब दावा करणारी सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘X’ नावाच्या एका युझरने, जिची खरी ओळख पडताळता आली नाही, आपण एक तरुणी असल्याचा दावा करत म्हटले आहे की, वार्षिक ४० लाख रुपये कमावणाऱ्या एका देखण्या वराचा लग्नाचा प्रस्ताव तिने केवळ यासाठी नाकारला, कारण तो विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांना आपला ‘आदर्श’ मानत होता!
नक्की काय आहे पोस्टमध्ये?

(फोटो सौजन्य -एक्स/ Aaruhi Reddy)
‘आरुही रेड्डी’ नावाच्या एका व्हेरिफाईड अकाऊंटवर या तरुणीने लिहिले, “मला नुकताच लग्नासाठी एक स्थळ आले होते. तो मुलगा देखणा होता, त्याला ₹४० लाखांचे आकर्षक पॅकेज होते आणि तो एका चांगल्या कुटुंबातील होता. पण मी त्याला फक्त एकाच कारणाने नकार दिला, त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर मी पाहिले की,”तो राहुल गांधींना आपला आदर्श मानतो.”
होय, तुमचा अंदाज बरोबर आहे. व्हायरल पोस्टनुसार, या तरुणीने राहूल गांधीचा चाहता असल्याने त्या तरुणाला नकार दिल्याचा दावा केला आहे.
त्याच पोस्टमध्ये तिने पुढे असेही लिहिले आहे की, “एक स्वाभिमानी राष्ट्रवादी हिंदू म्हणून, जो एका अपयशी व्यक्तीला आपला आदर्श मानतो, अशा व्यक्तीला मी माझा जीवनसाथी म्हणून कधीही स्वीकारू शकत नाही,” असे त्या युझरने पुढे म्हटले. कमेंट्स विभागात, त्या युझरने हेदेखील सांगितले की ती गेल्या महिन्यात १८ वर्षांची झाली आहे.

१७ ऑगस्ट रोजी शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली असून, तिला एक्स (X) वर ११२.१ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला आहे.
