आषाढी एकादशीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन काल सायंकाळी पावणेसातच्या सुमारास राहुल गांधींनी आषाढी एकादशीनिमित्त साध एक ट्वीटही केलं नसल्याचं सांगत राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं. मात्र नितेश यांच्या याच ट्विटखाली अनेकांनी राहुल गांधींच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन मराठीमध्ये आषाढीनिमित्त पोस्ट करण्यात आल्याचे स्क्रीनसॉर्ट पोस्ट केलेत.

नक्की वाचा >> “…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राहुल गांधी यांनी आषाढी एकादशीनिमित्त एक ट्वीटही केलं नाही. तुम्ही सत्ता गमावली की तुमचा राज्यामधील रसही कमी होतो, असा तुमचा फंडा आहे का?”, असा प्रश्न नितेश राणेंनी ट्विटरवरुन राहुल यांना टॅग करुन विचारला होता.

मात्र या ट्विटवर अनेकांनी राहुल गांधींनी आषाढीच्या दिवशी दुपारी २ वाजून २४ मिनिटांनीही विठ्ठलाच्या फोटोसहीत अगदी मराठीमध्ये फेसबुकवरुन सविस्तर पोस्ट केल्याचं नितेश यांच्या निदर्शनास आणून दिलं. अनेकांनी या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट या ट्विटला रिप्लाय म्हणून पोस्ट केला. मात्र त्यापेक्षाही अधिक राहुल यांची पोस्ट वारकरी संप्रदायाकडून कशाप्रकारे वैश्विक एकात्मता आणि मी पणा विसरुन आम्हीपणाची व्यापक भावना निर्माण करते याबद्दल भाष्य केल्याने चर्चेत आहे.

नक्की वाचा >> फडणवीसांना ‘उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या शरद पवारांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “अजित पवार…”

पोस्टमध्ये काय आहे?
“अठरापगड जातीत विभागलेला बहुजन समाज संतानी ‘विठ्ठल’नावाच्या एका ध्वजाखाली एकत्र आणला. लोकमानसाचे संस्करण करीत अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढे जाऊन वैश्विक एकात्मतेची संकल्पना मांडली,” असं राहुल गांधींनी म्हटलंय. पुढे याच पोस्टमध्ये, “जगाच्या औत्सुक्याचा आणि कौतुकाचा विषय असलेली पंढरीची वारी आणि पांडुरंग हे वैश्विक एकात्मतेचे प्रतीक आहे. ‘मी’ पणा विसरुन ‘आम्ही’ अशी व्यापक भावना जनसमुदायात निर्माण करून ‘पांडुरंग’ या ध्येयाप्रती घेऊन जाणारी वारी आणि आषाढी एकादशी हे आपले लोकसांस्कृतीक वैभव आहे,” असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी, “सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,” असंही म्हटलंय.

नक्की वाचा >> “त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…”; एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

राहुल गांधी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

नितेश राणेंनी केलेलं ट्विट आणि त्यावर लोकांनी केलेल्या कमेंट्समुळे ही पोस्ट चर्चेत आलीय. अनेकांना ही पोस्ट आवडल्याचं त्यावरील लाइक्स आणि कमेंट्स सेक्शनमधून दिसून येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi ashadi ekadashi 2022 post went viral many are sending screenshots to nitesh rane here is why scsg
First published on: 11-07-2022 at 15:32 IST