Rahul Gandhi Pune Chatron Ki Goonj programme fact check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये मोठ्या गर्दीचे एरियल (हवाई) दृश्य दिसत असून, हा व्हिडीओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील असल्याचा दावा केला जात आहे. पण, आमच्या तपासात असे आढळून आले की, हा व्हिडीओ जुना आहे आणि तो मेक्सिकोमध्ये रेकॉर्ड केला गेला होता. याचा राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमाशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.

हे फॅक्ट-चेक महत्त्वाचे होते. कारण – व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून एका मोठ्या राजकीय कार्यक्रमाचे ठिकाण आणि संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला होता. मेक्सिकोमधील फुटेज राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील गर्दीचे असल्याचा दावा करून शेअर करण्यात आले. हा दावा एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला, ज्यामुळे कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल प्रेक्षकांची दिशाभूल होण्याची शक्यता होती.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर Amit Sharma INC यांनी दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील असाच दावा करून हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

https://www.instagram.com/reels/DcXRViAgMj8

तपास

आम्ही व्हायरल व्हिडीओचे कीफ्रेम्स काढून तपास करायला सुरुवात केली.

त्यातील एका कीफ्रेममध्ये “Mexico 26” स्पष्टपणे दिसत आहे.

fact check viral video

त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. यामुळे आम्हाला एका थ्रेड्स (Threads) अकाउंटची माहिती मिळाली.

https://www.threads.com/@carlotavizmanos/post/DaO8lWmkqKo/video-asi-se-ha-celebrado-el-primer-gol-de-mexico-en-el-zocalo

कॅप्शनमध्ये म्हटले होते (भाषांतर): मेक्सिकोच्या पहिल्या गोलचा झोकालोमध्ये अशा प्रकारे जल्लोष करण्यात आला.

आम्हाला हा व्हिडीओ पत्रकार कार्लाटा विझमनोस (Carlota Vizmanos) यांच्या व्हेरिफाईड इन्स्टाग्राम हँडलवरदेखील सापडला.

https://www.instagram.com/reels/DaO8eEasxYN

बायोमध्ये नमूद केल्यानुसार, कार्लाटा या टेलीमुंडो (Telemundo) (एक स्पॅनिश वेबसाईट) मध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर आहेत.

मेक्सिकोने विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली, त्यामुळे लाईटहाऊस जर्नालिझमला याबाबतचे अनेक रिपोर्ट्सही सापडले.

https://elpais.com/mexico/2026-06-11/mexico-sudafrica-la-inauguracion-del-mundial-2026-en-vivo.html

https://www.aljazeera.com/news/2026/7/1/mexico-ecuador-fifa-world-cup-2026-score-jimenez-quinones-hincapie

निष्कर्ष

राहुल गांधी यांच्या पुणे कार्यक्रमातील फुटेज असल्याचा दावा करून प्रसारित केला जाणारा व्हिडीओ प्रत्यक्षात मेक्सिकोमधील आहे. जुलै २०२६ मध्ये झालेल्या एका सामन्यात इक्वेडोरवर मेक्सिकोने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या फुटबॉल चाहत्यांची गर्दी या व्हिडीओमध्ये दिसते. या जुन्या व्हिडीओचा राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाशी कोणताही संबंध नाही.