थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी बुधवारी राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या खऱ्याखुऱ्या पावसाबरोबरच सोशल मीडियावरही मिम्स, फोटो आणि व्हिडीओंचाही पाऊस पडल्याच पहायला मिळालं. मात्र या सोशल नेटवर्किंगवरील पावसामध्ये दुर्गराज रायगडवरील एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला असून सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणार राष्ट्रपती कोविंद

पाऊस म्हटल्यावर तरुणाईला सर्वात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे ट्रेकिंग आणि सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये इतिसाहाचे साक्षीदार म्हणून ऊन, वारा, पावसाशी झुंज देत इतिहासाचे साक्षीदार बनवून उभे असणारे छत्रपती शिवाजी महाजारांचे किल्ले. याच किल्ल्यांमधील सर्वात महत्वाचा किल्ला आहे रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांची राजधानी असणारा हा किल्ला आज लाखो शिवप्रेमींसाठी श्रद्धास्थान आहे. त्याच या किल्ल्यावर पावसामध्ये भटकंतीसाठी जाणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचं दर्शन घेऊन येणं हे अनेकांसाठी दर पावसाळ्यामध्ये आवर्जून करण्याच्या गोष्टींपैकी एक आहे. पावसाळ्यामध्ये या किल्ल्यावरील दृष्य डोळ्याचं पारणं फेडणार आहे.

नक्की वाचा >> रायगडावर पर्यटकांना प्रवेशबंदी; सात डिसेंबरपर्यंत बंदी लागू करत असल्याची पोलिसांची माहिती

बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामध्येही रायगड फारच सुंदर दिसत होता. रायगडावरील हे सौंदर्य कॅमेरात टिपलं गेलं असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये आधी रायगडावर पडणारा पाऊस दाखवण्यात आलाय. नंतर कॅमेरा पॅन होऊन मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दृष्य दिसत आहे. भर पावसातील मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा फारच सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणी काढलाय याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र या व्हिडीओच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील गाणी लावून तो चांगलाच व्हायरल झाल्याचं चित्र दिसत आहे. अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर हा व्हिडीओ सध्या दिसून येत आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

दरम्यान, लांबलेल्या मोसमी पावसामुळे लुप्त झालेली ‘ऑक्टोबर हीट’ची स्थिती आणि नोव्हेंबरमध्ये तीनही ऋतूंची अनुभूती राज्यातील नागरिकांना मिळाल्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात हवामानाचा लहरीपणा नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. बुधवारी अनेक भागांत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. पश्चिम कोकणात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या नोंदींनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे २८.६ मिमी, कुलाबा येथे २७.६ मिमी, डहाणू येथे ११.६ मिमी, ठाणे येथे २७.२ मिमी पाऊस पडला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad fort viral video of chhatrapati shivaji maharaj meghdambari statue in rain scsg
First published on: 02-12-2021 at 08:43 IST