RailOne vs IRCTC Rail Connect App Comparison : आता रेल्वेचं तिकीट बुक करणं खूप सोपं झालं आहे. मोठ्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही. प्रवासाला निघण्याआधीच आपण मोबाईलवरून काही मिनिटांत तिकीट बुक करू शकतो. ऑनलाइन तिकीट बुकिंग ॲप्सच्या मदतीने आपल्याला आरक्षण, तत्काळ तिकीट, तिकीट कॅन्सल करणे, PNR स्टेटस पाहणे अशा अनेक सुविधा मिळतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि प्रवासाची तयारीही अधिक सोयीस्कर होते.
आपल्यातील अनेक जण ट्रेनची तिकिटे बुक करण्यासाठी आधीपासूनच आयआरसीटीसी (IRCTC), युटीएस (UTS) वापरत असाल. पण, तुम्हाला रेल्वेच्या नवीन रेलवन (RailOne) ॲप बद्दल माहिती आहे का? हे ॲप लोकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. रेलवन ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स (CRIS) द्वारे विकसित करण्यात आले आहे. त्यांचा उद्देश सर्व रेल्वे सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करणे असा आहे. तर आता आपण आयआरसीटीसी आणि रेलवन मधील फरक सोप्या भाषेत समजून आणि तुमच्यासाठी कोणते ॲप अधिक फायदेशीर याबद्दलही माहिती देणार आहोत.
IRCTC Vs RailOne : दोन्ही ॲप्समधील मुख्य फरक काय ?
आरक्षित (Reserved) आणि तत्काळ (Tatkal) तिकिटे बुक करण्यासाठी आजही IRCTC ॲप सर्वाधिक वापरले जाते. मात्र, RailOne ॲप फक्त तिकीट बुकिंगपुरते मर्यादित नाही. त्याद्वारे रेल्वेशी संबंधित इतर अनेक सुविधा आणि सेवांचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता
RailOne द्वारे, तुम्ही जनरल कोच, प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनची तिकिटे देखील बुक करू शकता.
पूर्वी यासाठी UTS ॲप वापरले जात होते. आता, रेल्वे हळूहळू ही वैशिष्ट्ये (फीचर्स) RailOne मध्ये ट्रान्सफर केली आहेत.
RailOne ॲपचे फायदे…
जर तुम्ही वारंवार ट्रेनने प्रवास करत असाल. तर RailOne ॲप खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत…
वेग – जनरल तिकीट बुक करताना हे RailOne ॲप IRCTC पेक्षा जास्त वेगाने काम करतो.
लांब रांगा – तुम्ही स्टेशनला पोहचण्याआधी, कोणीतही रांग न लावता जनरल तिकीट काढू शकता, जे रोज प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान आहे.
प्रोफाइल सेव्हिंग – तुम्ही या ॲपमध्ये प्रवासाची माहिती आधीच सेव करून ठेवू शकता. त्यामुळे तिकीट बुक करताना तुमचा खूप वेळ वाचतो.
सिंगल साइन-ऑन – तुम्ही तुमच्या जुन्या IRCTC आणि UTS खात्यांचा वापर करून या ॲपमध्ये लॉग इन करू शकता.
ऑल इन वन – हा ॲप लाइव्ह ट्रेन ट्रॅकिंग, पीएनआर स्टेटस, कोच पोझिशन, फूड ऑर्डरिंग यांसारखी सर्व फीचर्स एकाच ठिकाणी पुरवण्यास मदत करते.

IRCTC Vs RailOne : तुमच्यासाठी कोणता ॲप बेस्ट आहे?
जर तुम्हाला फक्त आरक्षित आणि तत्काळ तिकीट बुक करायचे असेल, तर IRCTC ॲप वापरू शकता. विशेषतः सकाळी तत्काळ तिकीट बुक करताना ते अधिक सुरक्षित आहे.
दुसरीकडे, RailOne नवीन आहे आणि त्यात कधीकधी तांत्रिक बिघाड किंवा पेमेंटच्या समस्या येऊ शकतात. पण, जर तुम्हाला लोकल, प्लॅटफॉर्म तिकीट, लाइव्ह लोकेशन बुकिंग आणि फूड ऑर्डरिंग यांसारखी सर्व फीचर्स एकाच ठिकाणी असतील, तर RailOne तुमच्या फोनसाठी एक उत्तम ऑल-इन-वन पर्याय आहे हरकत नाही.
