Railway Accident Video : धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना प्रवाशांच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. रेल्वे स्टेशनवरील अशा अनेक घटनांचे थरारक व्हिडीओ समोर देखील आले आहेत, मात्र तरीही प्रवासी असे जीवघेणे प्रयत्न करताना दिसतात. यात अशीच एक घटना समोर आली आहे. एका प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये एका मुलासह त्याच्या आईला चढवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यानंतर जे व्हायचे नव्हते तेच घडले. या थरारक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वेने प्रवास करताना तुम्हीही असे धाडस करु नका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला आणि तिच्या लहान मुलगा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी महिलेच्या मागून एक तरुण आला आणि त्याने पहिल्यांदा मुलाला ट्रेनमध्ये चढवले. यानंतर महिलेला चढवण्याचा प्रयत्न करतो, पण ट्रेनचा वेग इतका होता होता की, महिलेला चढायला जमले नाही, तिचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मवर जोरात कोसळली, या घटनेमुळे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला होता. पण लोक पटकन मदतीला धावले आणि तिला पटकन बाजूला खेचले त्यामुळे ती मरता मरता वाचली. यावेळी तिला ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न करणारा तरुण मुलाला उतरवण्यासाठी जोर- जोरात ओरडता ट्रेन थांबवण्याची विनंती करत होता, पण अखेर प्रवाशांनी चेन खेचली आणि ट्रेन थांबली, ज्यानंतर तरुण धावत त्या मुलाच्या आईच्या दिशेने जातो. More Trending News : “रेल्वे पोलिसांनो, हिला ताबडतोब तुरुंगात टाका” रेल्वे स्टेशनवरील तरुणीचे कृत्य पाहून प्रवाशांचा संताप, VIDEO वर म्हणाले… या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ rishabha93 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्या तरुणाची चुकी असल्याचे म्हणत यावेळी त्या महिलेच्या किंवा मुलाच्या जीवाचे बरे वाईट झाले असते तर तो तरुणाच जबाबदार असता असे म्हटले, तर काहींनी ट्रेन परत दुसरी येईल पण जीव परत येणार नाही म्हणत त्या तरुणाच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. वारंवार सुचना देऊनही अनेक रेल्वे प्रवासी अशाप्रकारे जीवघेणा प्रवास करताना दिसतात. अशा घटनांमध्ये आजवर अनेकांनी आपला जीव गमावला, मात्र त्यानंतरही लोकांना जाग येत नाहियेय. शेवटी ट्रेन असल्याप्रमाणे ते चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचे धाडस करतात. अशावेळी ते स्वत:सह इतरांचा जीवही धोक्यात घालतात.