Viral video:रेल्वे रुळ ओलांडू नका, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात, पण यामध्ये अनोकांचा अपघात होतो. तर अनेक जण जिवानीशी जातात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. दोन महिला रेल्वे रुळ ओलांडताना समोर ट्रेन येते अन् क्षणात होत्याचं नव्हतं होतं…काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. रेल्वेस्थानकावर असलेल्या फूट ओव्हरब्रीजचा वापर करूनच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे सक्तीचे आहे. तरीसुद्धा कारवाईची चिंता न करता असंख्य प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात.
एका स्टेशनवरचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला रुळ ओलांडत प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मात्र त्यांना वर काही चढता येत नाहीये. याचवेळी टर्मिनस ट्रेन रेल्वे स्थानकात त्याच ट्रॅकवर येते आणि महिला चिरडून टाकते. ट्रेन येण्याआधी काही सेकंद प्लॅटफॉर्मवरचे लोक महिलांनावर येण्यासाठी हात देताना आणि मदत करताना दिसत आहेत मात्र अवघ्या काही सेकंदाच ट्रेन येते आणि थरारक अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की महिलांच्या शरिराचा कोणत्याच भाग रुळावर दिसला नाही.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DX9sWbvzhJF/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==
‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी ही घटना आहे. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा म्हणून रेल्वेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रेल्वेकडून संरक्षण जाळ्यांना वंगण (ग्रीस) लावले जात आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडणे कठीण होईल आणि परिणामी रेल्वे अपघातात घट होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र तरीही काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात.
