Railway employee exchange 500 rupees note into 20 rs money shocking video goes viral on social media gps 97 | Loksatta

Video: रेल्वे कर्मचाऱ्याची हात चलाखी…; तिकीट काऊंटरवरील ‘हा’ व्हिडिओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

रेल्वे कर्मचाऱ्याने प्रवाशासोबत केलेली फसवणुकीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Video: रेल्वे कर्मचाऱ्याची हात चलाखी…; तिकीट काऊंटरवरील ‘हा’ व्हिडिओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
photo(twitter/Railwhispers)

रेल्वे संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. रेल्वेने प्रवास करतेवेळी असा काहीतरी प्रकार घडतं असेल याचा तुम्ही विचारही केला नसेल. तुमच्या डोळ्यादेखत असं काहीतरी होत असाव हे तुम्हाला कदाचित माहितही नसेल. त्यामुळे जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर सावध व्हा. त्याआधी हा धक्कादायक व्हिडिओ एकदा पाहाच..

बरेच लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्हीही त्यापैकी एक असाल. तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा. रेल्वेने प्रवास करायला निघालेली एक व्यक्ती रेल्वे तिकीट काऊंटवर तिकीट काढायला जाते. तिथं रेल्वे कर्मचारी त्या प्रवाशासोबत जे करतो ते धक्कादायक आहे. प्रवाशानेच हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

( हे ही वाचा: Video: नग्नावस्थेत तब्बल २५०० लोकं पोहोचली एकाच ठिकाणी…कारण ऐकाल तर..)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू सकता एक व्यक्ती तिकीट काऊंटवर तिकीट काढायला येते. तिकीट काढतेवेळी त्या व्यक्तीच्या हातात ५०० रुपयांची दिसत असते. ही व्यक्ती तिकीट काढून देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याकडे तिकीट मागते. रेल्वे कर्मचारी त्या व्यक्तीला तिकिटाची किंमत १२५ रुपये असल्याचं सांगते आणि स्वतःच्या हातात असलेली २० रुपयाची नोट दाखवते. म्हणजे प्रवाशाने आपल्याला फक्त २० रुपये दिले आणि तिकिटाची किंमत १२५ रुपये असल्याचं सांगून ती प्रवाशाकडे तिकीट मागते. मात्र या व्हिडीओत सुरुवातीला प्रवाशाने ५०० रुपयाची नोट दिल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. मग तिकीट काढून देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या हातात अचानक २० रुपयांची नोट काशी आली? आणि ५०० रूपये देऊन सुद्धा रेल्वे कर्मचारी तिकिटाचे १२५ रुपये का मागत आहे? सुरुवातीला व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही गोंधळात पडाल.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: डोक्यावर पदर, लेहेंगा आणि ते…; ‘या’ दोन महिलांच्या तुफान बुलेटस्वारीवर नेटकरीही फिदा)

मात्र व्हिडिओ नीट पाहिल्यावर समजते की, प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्याला ५०० रुपयांची नोट देताच कर्मचारी त्याला कुठे जायचं आहे हे पुन्हा विचारून बोलण्यात गुंतवतो. रेल्वे कर्मचाऱ्याच्या एका हातात ५०० रुपयांची नोट असते त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या हाताने हा कर्मचारी कुणाला समजणार नाही अशाप्रकारे नोट लगेच बदलतो. आणि प्रवाश्याला तिकिटाचे किंमत सांगून २० रूपये दाखवतो. या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्याचा हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 18:11 IST
Next Story
SUV ची कमाल! ‘ती’ पाच मुलांची आई पोहोचली केरळहून थेट Fifa World Cup कतारला!