scorecardresearch

Premium

लज्जास्पद! धावत्या रेल्वेतून कर्मचाऱ्याने थेट रुळावर फेकला कचरा; Viral Video पाहून भडकले लोक

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेल. पण प्रवाशांकडून होणारा कचरा कसा साफ केला जातो? असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? जर रेल्वेतील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात हे तुम्हाला माहित नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा.

railway Employee sweepers dumped waste garbage on railway track from running train coach watch viral video
रेल्वे कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वेतून बाहेर फेकला कचरा (फोटो सौजन्य – एक्स,@trains_of_india)

Indian Railway Service : रेल्वे प्रवासादरम्यान लोक खाण्या-पिण्याची सर्व सोय करतात जेणेकरून लांबचा प्रवास व्यवस्थित पूर्ण होईल. अशावेळी अनेकदा प्रवासी वापरलेले खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, कागद, रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा रेल्वेमध्येच टाकतात मग जनरल डब्बा असो की एसी. लोकांची अस्वच्छता पसरवण्याची सवय काही सहजा सहजी जात नाही. प्रवास संपल्यानंतर प्रवासी हा कचरा गोळा करून व्यवस्थित कचऱ्याच्या डब्यात टाकत नाही. अशा परिस्थितीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक रेल्वेच्या कोचची साफ सफाई करावी लागते आणि सर्व कचरा एकत्र करावा लागतो ज्यानंतर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. पण सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.

रेल्वे कर्मचाऱ्याने धावत्या रेल्वेतून बाहेर फेकला कचरा

व्हायरल व्हिडीओमध्ये रेल्वेतील कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जात आहे हे पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कामकाजाची पोलखोल झाली आहे. ही २१ सेकंदाची क्लिप पाहिल्यानंतर तुमचे डोळे उघडतील. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रेल्वे कर्मचाऱ्याने कचरा गोळा केला आहे आणि गोळा केलेला कचरा तो थेट बोगीच्या दरवाज्यातून बाहेर रुळावर फेकून देतो आहे. रेल्वे कर्मचाऱ्याचीही कृती पाहून लोक रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करू लागल आहेत.

Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
shocking video a Passengers travel in toilet overcrowded train
धक्कादायक! प्रवाशांनी चक्क रेल्वेच्या शौचालयात उभं राहून केला प्रवास, रेल्वेतील भयंकर गर्दीचा VIDEO होतोय व्हायरल
state and central government authority, responsibility, Alibag Vadkhal road, Bad condition
अलिबाग वडखळ मार्ग नेमका कोणाचा? दुरुस्तीच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी
a traffic police keep his duty in filmy style while controlling traffic on the highway
कर्तव्याला कलेची जोड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला फिल्मी स्टाइल अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – नवरा निघाला चुलत भाऊ! लग्नाच्या ३ वर्षांनी समजले धक्कादायक रहस्य, पत्नीला बसला धक्का…

अशी लावली जातेये रेल्वेतील कचऱ्याची विल्हेवाट

सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. एक्स (X) म्हणजेच ट्विटरवर@trains_of_indiaनावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हाव्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”स्वच्छ भारत अभियान आणि भारतीय रेल्वे सेवा. भारतीय रेल्वेच्या ९९% गाड्यांमधील हे नेहमीचे दृश्य. प्रोटोकॉलबाबत माहिती नाही पण हे प्रशासनाच्या कारभाराचे अपयश आहे. दररोज हजारो टन कचरा रेल्वे रुळांवर टाकला जातो. त्याला जबाबदार कोण?”

हेही वाचा – ‘आणखी काही पाहिजे… सिगारेट, सिक्रेट गांजा? झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केला धक्कादायक मेसेज अन्…

हेही वाचा – पाय फ्रॅक्चर असूनही लाठी-काठी खेळ सादर करतायेत ‘या’ वॉरिअर आजी, व्हिडीओ होतोय व्हायरल

रेल्वे कर्माचऱ्यांच्या बेजबाबदार कामकाजाची पोलखोल

त्याच अकाउंटवरून आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये एक रेल्वे कर्मचारी कचरा उचलून थेट रेल्वेतून बाहेर टाक आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ”जर तुम्हाला वाटत असेल की हे फक्त काही रेल्वेपुरते मर्यादित आहे तर तुम्ही चुकीचे आहात, वंदे भारत आणि तेजस सारख्या काही ट्रेन्स व्यतिरिक्त, ही प्रथा भारतातील इतर प्रत्येक ट्रेनमध्ये आहे, उच्च अधिकार्‍यांना याची चांगली माहिती आहे पण कोणाला त्याची पर्वा नाही.

व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

११ सप्टेंबर रोजी पोस्ट केलेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. याशिवाय अनेकांनी कमेंट करून रोष व्यक्त केला आहे. एकाने लिहिले – ”हे खूप चुकीचे आहे, ही आळशीपणाची हद्द झाली. दुसरा म्हणाला – ”त्या व्यक्तीवर कारवाई करावी.” त्याचवेळी तिसऱ्याने लिहिले – ”राजधानी एक्सप्रेस दिसत आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान तुम्हालाही असा अनुभव आला आहे का?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway employee sweepers dumped waste garbage on railway track from running train coach watch viral video snk

First published on: 11-09-2023 at 20:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×