Railway Minister Ashwini Vaishnav Travels In Mumbai Local Train : सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे आणि सर्वसामान्य लोकांशी संवाद साधणे हा राजकारणातील नवा ट्रेंड बनत आहे. आतापर्यंत आमदारांपासून केंद्रातील मंत्र्यांपर्यंत) अनेक जण मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसले आहेत. यात आता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई लोकल ट्रेनमधून सर्वसामान्य प्रवाशांसह प्रवास केला. यावेळी त्यांनी सीटवर आरामात बसून ट्रेनमधील प्रवाशांबरोबर गप्पादेखील मारल्या, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी ट्रेनमधून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचून दाखवला आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.३४ वाजता ट्रेन पकडली. यानंतर २७ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर दुपारी ३.१८ वाजता ते भांडुप स्थानकावर उतरले. यादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवादही साधला. (Railway Minister Ashwini Vaishnav Mumbai Local Train Viral Video)

Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Boy hold funny poster at lalbaug mumbai video goes viral on social Media
“फक्त गर्दीत हात धरणारी नको…” लालबागमध्ये तरुणाची पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या; असं लिहलंय तरी काय? पाहा VIDEO
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Cursed parking area this puneri pati viral on social media teaching lesion to rekless drivers in puneri style
‘शापित पार्किंग क्षेत्र, विश्वास नसल्यास….!”, नो-पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेकरांचा टोला; पुणेरी पाटी Viral
Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका पुरस्कार समारंभासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत आले होते. यावेळी अंबरनाथला जाणाऱ्या धीम्या लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यात ते चढले आणि भांडुप स्थानकावर उतरले. पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईतील एका गणेश मंडळालाही भेट देणार होते.

Read More Indian Railway Related News: ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”

अश्विनी वैष्णव यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना आणि इतर वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या या व्हिडीओवर आता युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचून दाखवला आहे.

भांडूपमधील वडापावचा घेतला आस्वाद

केंद्रीय रेल्वे मंंत्री भांडुपमधील मराठा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी भांडुपमधील प्रसिद्ध अशा ‘भाऊ’च्या वडापावचादेखील आस्वाद घेतला. दरम्यान, वडापावचं बिल देण्यासाठी त्यांनी विक्रेत्याला डिजिटल पेमेंट नाही का? असा प्रश्न केला. त्यांचा मुंबई लोकलमधील प्रवासाचा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे.

वाचा युजर्स काय म्हणाले?

एका युजरने लिहिलेय की, ‘रेल्वे मंत्री महोदय, लोकल ट्रेनच्या प्रवाशांना तुम्ही तुमचे कुटुंब मानता अशी अपेक्षा आहे, जेणेकरून रेल्वे अधिकारी प्रवाशांबरोबर दुजाभाव करणार नाहीत. एक्स्प्रेस गाड्यांनाआधी जाऊ देण्यासाठी लोकल ट्रेन चार-पाच स्थानकांवर पहिलीच थांबवली जाते. कारण लोकल ट्रेन हे तुमचे प्राधान्य नाही.’

आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘कोणत्याही कोचच्या टॉयलेटमध्ये पाणी नाही, ट्रेनचा क्रमांक 19308 आहे आणि माझा पीएनआर क्रमांक 2221528612 आहे.’

तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘आता राहुल गांधी कलाकारांना कामावर ठेवतील आणि ते एक व्हिडीओ बनवतील आणि दावा करतील की टीटीला त्यांच्या जातीनुसार काम मिळत नाहीये.’ शेवटी एका युजरने लिहिले आहे की, ‘आम्ही शेतात काम करणारे लोक आहोत, तुमच्यासारखे रील्स आणि सेल्फी घेणारे लोक नाही. सर, कृपया ०२५६९ ट्रेनच्या विलंबाकडे लक्ष द्या, दररोज विलंब होत आहे.’

अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ‘वडापाव’देखील खाल्ला होता.