Indian Railways Video : भारतीय रेल्वेसंदर्भात सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कधी रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी, गर्दीने भरलेली रेल्वे स्थानके तर कधी खचाखच प्रवाशांनी भरलेले ट्रेनचे व्हिडीओ पाहायला मिळतात. यात असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक प्रवासी ट्रेनमधील टॉयलेटजवळ तर बेसिनच्या खाली झोपलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी रेल्वेच्या सुविधांवर ताशेरे ओढले आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे अशा स्थितीत अनेक प्रवासी अगदी छोट्याश्या जागेत एकामेकांच्या अगदी जवळ झोपले आहेत, इतकेच नाही तर काहीजण ट्रेनमध्ये जागा नसल्याने टॉयलेटच्या दरवाजाजवळ काही बेसिनच्या अगदी खाली गर्दी करुन झोपले आहेत, हा व्हिडीओ छत्तीसगड एक्स्प्रेसमधील आहे. अगदी वाईट परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमधून प्रवास करावा लागतोय.

Railway Video
Video: धावत्या ट्रेनमध्ये जोडप्यांसह तरुणाचा तुफान राडा पाहून नेटकरी म्हणाले, “रेल्वेतील सीटची समस्या ही…”
Indian Railway Rule
रेल्वे तिकीट असतानाही प्रवाशाला टीटी रेल्वेतून उतरवणार, कारण काय? रेल्वेचा ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का?
Elephant Viral Video
धावत्या रेल्वेची हत्तीला धडक! आधी उठला व मग रुळांवर पडला अन्… हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Mumbai rain heavy rain
मुंबई तुंबली! मुसळधार पावसामुळे रस्ते अन् रेल्वे सेवा बंद, लोकांना नुसता मनस्ताप, पाहा VIRAL VIDEO
around eight lakh cricket lovers participate india t20 world cup victory parade
विजयी मिरवणुकीत आठ लाख क्रिकेटप्रेमी, अपेक्षेच्या तिप्पट गर्दी; पोलीस, रेल्वे पोलिसांची तारांबळ
Vande Bharat Express train
वंदे भारत ट्रेनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती, प्रवाशांनी VIDEO शेअर करताच रेल्वेने दिलं उत्तर, “अडथळा आल्याने..”
cctv camera, Thane station,
ठाणे स्थानकातील ३४ कॅमेरे बंद, निगराणी नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
young boys were sprinkling water on Train then passengers beat them
चालत्या ट्रेनवर पाणी उडवत होते, लोकांनी खाली उतरून तरुणांना धू धू धुतले, पाकिस्तानचा व्हिडीओ व्हायरल

ट्रेनमधील भयंकर स्थितीचा हा व्हिडीओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, हे दृश्य छत्तीसगड एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 18237) मधील आहे. सीट, फरशी, गेट, गॅलरी, बाथरूम… ज्याला जागा मिळाली तो तिथेच बसून झोपला. युरेशियावाले रेल्वे मंत्री महोदय, कृपया गरीबांच्या ट्रेनकडेही लक्ष द्या आणि डब्यांची संख्या वाढवा.

या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला, ज्यावर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेनेही त्यावर कारवाई केली आहे. रेल्वेच्या @RailwaySeva अकाउंटवरुन यावर टिप्पणी करण्यात आली आहे, ज्यात लिहिले की, संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले जात आहे. त्याचबरोबर काही युजर्सनीही व्हिडिओ पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले आहे, “भारतीय रेल्वे नीट धावू शकत नाही आणि बुलेट ट्रेन चालवण्याबाबत बोलत आहे”.

धक्कादायक! भररस्त्यात महिलेचा तोंड दाबून विनयभंग अन् मदतीसाठी ओरडताच…; घटनेचा video व्हायरल

आणखी एका युजरने लिहिले आहे, “भारतातही लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची वेळ आली आहे”. तिसऱ्या युजरने लिहिले, “या स्थितीसाठी सरकारचा दोष नाही, जनताच दोषी आहे, गेल्या २-३ वर्षांपासून रेल्वेची ही अवस्था आहे”.