सध्या सोशल मीडियावर एका रेल्वेतील प्रवासी आणि टीसींच्या भांडणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्हिडीओमध्ये दोन टीसींनी या प्रवाशाला लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केल्याचही दिसत आहे. ही घटना लोकमान्य टिळक टर्मिनलवरुन जयनगरकडे जाणाऱ्या पवन एक्स्प्रेसशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी हिंदी या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशासोबत टीसीचे भांडण झालं. ढोली स्टेशनजवळ दोन टीसी रेल्वेमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी आले. त्यावेळी वरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला टीसींनी तिकीट दाखवायला सांगितलं असता, त्याने आपण लोको पायलट असल्याचे सांगितलं, त्यानंतर टीसीने ओळखपत्र मागितलं तर त्याने ते दाखवण्यासही नकार दिला आणि आपण मोठा अधिकारी असल्याचं तो सांगू लागला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

हेही पाहा- GST विभागाचा अजब कारभार; बेरोजगार तरुणाला पाठवली १ कोटी ३६ लाखांचा टॅक्स भरण्याची नोटीस

प्रवाशाने ओळखपत्र आणि तिकीट दाखवण्यास नकार दिल्याने टीसी रागवला आणि या दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी विना तिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीने टीसीला लाथ मारली. प्रवाशाने लाथ मारल्यानंतर रागावलेल्या दोन्ही टीसींनी डब्यात उपस्थित लोकांसमोरच त्या व्यक्तीला वरच्या सीटवरुन खाली खेचलं आणि जोरदार लाथा बुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

टीसी आणि प्रवाशाच्या मारहाणीचा हा व्हिडीओ एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला होता. तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन टीसींवर कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान दोन्ही टीसींना निलंबित केल्याचंही सांगण्यात येत आहे.