scorecardresearch

Premium

१२ वीच्या परीक्षेत चांगले गुण देतो सांगत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून करुन घेतली शेतीची कामे, प्रकरण उघडकीस येताच…

मुख्याध्यापकाने बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून देतो असं सांगून दोन दिवस शेतातील पिकाची कापणी करायला लावली.

Rajasthan Principal of Government Higher Secondary School Viral news
मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना करायला लावली पिकाची कापणी. (Photo : Social Media)

राजस्थानच्या चुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण देतो असं सांगून चक्क शेतातील कामे करायला लावल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर सीबीईओने मुख्याध्यापकावर कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबतचे वृत्त आजतकने दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सरदारशहरातील रुपलीसर गावतील आहे. येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश प्रसाद शर्मा यांनी शाळेत शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून देतो असं सांगून दोन दिवस शेतातील बाजारीच्या पिकाची कापणी करायला लावली.

जेव्हा मुलांच्या पालकांना शेतात काम करायला लावल्याची माहिती समजली तेव्हा त्यांनी मुख्याध्यापकांना फोन केला तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, मुलांना कामानुसार मोबदला देईन. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शाळेच्या गेटला कुलूप लावून दोन तास निदर्शने करत मुख्याध्यापकांना शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली.

National level selection
ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड, शर्विन कार्व्हालो विद्यार्थ्यास संशोधनासाठी पाठ्यवृत्ती
muslim student beating
“धर्माच्या आधारावर विद्यार्थ्याला शिक्षा दिली जात असेल तर…”, सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल
Priyadarshini Women College
वर्धा : लाजवाब! बाजरीची आंबिल, ज्वारीच्या घुगऱ्या, नाचणीची लापसी, राजगिऱ्याची कचोरी… तृणधान्याच्या खाद्यजत्रेबद्दल जाणून घ्या
ashram school students
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांला अधीक्षकाकडून बेदम मारहाण

हेही पाहा- डिझेलचे पैसे वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, बनवला चक्क CNG वर चालणारा ट्रॅक्टर; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क

काम केलं पण मोबदला मिळालाच नाही – विद्यार्थी

निषेधादरम्यान, १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, “मुख्याध्यापकांनी आम्हाला सांगितले की, ‘माझ्या शेतातील पिकाची कापणी करायची आहे, याच्या बदल्यात तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण देईन आणि कामाचे पैसेही मिळतील.’ आम्ही एक दिवस काम केले, पण आम्हाला काहीही दिलं नाही. मुख्याध्यापकांनी पैसे दुसऱ्या दिवशी देतो असे सांगितले. परंतु, अद्याप आम्हाला पैसे दिले नाहीत.”

हेही पाहा- “प्रतीक्षा संपली, आता निकाल जाहीर होणार…” कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या माकडाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, सुरुवातील मुख्याद्यापकाने सर्व आरोप फेटाळले, मात्र पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विरोध पाहता त्यांनी विद्यार्थ्यांना शेतात काम करायला लावल्याचं कबूल केलं. दरम्यान, प्राचार्य शर्मा यांची तक्रार सीबीईओ अशोक पारीक यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार कारवाईचे आदेश जारी करताना, त्यांनी मुख्याध्यापक जगदीश प्रसाद शर्मा यांना रूपलीसर शाळेमधून काढण्यात आलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. असंही अशोक पारीक यांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajasthan news saying that they will get good marks in the 12th exam the headmaster asked the students to do the agricultural work jap

First published on: 21-09-2023 at 13:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×