scorecardresearch

रजनीकांतचा ‘अन्नतथे’ मुंबईच्या अरोरा थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही; जाणून घ्या कारण

रजनीकांतच्या चित्रपटांचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे अरोरा थिएटर यावेळी पूर्ण अंधारात असेल.

रजनीकांतचा ‘अन्नतथे’ मुंबईच्या अरोरा थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही; जाणून घ्या कारण
रजनीकांतचा 'अन्नतथे' सिनेमा अरोरा थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही (फोटो: IE )

रजनीकांतचा पुढचा चित्रपट ‘अन्नत्ते’ला बंपर ओपनिंग मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. रजनीकांतच्या चित्रपटांचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे अरोरा थिएटर त्या दिवशी पूर्ण अंधारात असेल.

काय आहेत कारणं?

नंबी राजन हे रजनीकांतचा खूप मोठा चाहते आहेत. ते गेल्या तीस वर्षांपासून सुपरस्टारचे सर्व चित्रपट प्रदर्शित करतात पण सध्या त्याचे भावनिक नुकसान झाले आहे. ते म्हणतात, “हे आर्थिक नुकसान नसून माझं सर्वात जास्त भावनिक नुकसान होत आहे. आणि कारण मी रजनी सरांचा चित्रपट माझ्या सिनेमागृहात दाखवू शकत नाही.” अरोरा येथे चित्रपट प्रदर्शित होऊ न शकण्याची काही कारणे त्यांनी सांगितली. ते म्हणाले, “अनेक मोठ्या लोकांनी, कंपन्यांनी वितरण क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे आम्ही चित्रपट वितरणाची संधी गमावली आणि दुसरे म्हणजे सरकारने दिलेल्या ५० टक्केच क्षमतेच्या आदेशाचा आमच्या सिनेमा हॉलसाठी किंवा मोठ्या संख्येने येणाऱ्या रजनी चाहत्यांसाठी काहीही उपयोग होणार नाही.”

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )

ते पुढे म्हणाले, “माझं थिएटर आतून थोडं खराब झालं आहे पण मला चित्रपटाचं वितरण मिळालं असतं तर मी व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता. पण आता ते शक्य नाही आणि ही माझ्यासाठी खूप निराशाजनक भावना आहे.”

चित्रपट निर्माते बेजॉय नांबियार यांनी देखील अरोरा येथे चित्रपट पाहण्यास उत्सुक होते. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “सर्व सिनेमा कोविडच्या परिणामातून सावरत आहेत आणि नंबी सरही तेच करत आहेत. मी त्यांच्याशी थिएटरच्या स्थितीबद्दल दीर्घ गप्पा मारल्या आणि मला आशा आहे की ते शक्य तितक्या लवकर पुन्हा सुरू करतील. आम्ही तिथे जाऊन पूर्वीसारखे चित्रपट पाहू शकू. मलाही अरोरा फर्स्ट डे फर्स्ट शोमध्ये जाऊन रजनी सरांचा चित्रपट बघायला आवडेल. मला वाटते की मला ते आता जवळच्या मल्टिप्लेक्समध्ये करावे लागेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-11-2021 at 11:41 IST

संबंधित बातम्या