Raksha Bandhan Special Viral Video : बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी जिव्हाळा आणि आपुलकी असते. ते एकमेकांबरोबर खूप भांडतात पण एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. लहानपणापासून एकमेकांना सहकार्य करत, काळजी घेत बहीण भाऊ एकमेकांना जपतात. एकमेकांची कधी खोडी काढतात तर कधी एकमेकांना चिडवतात. कधी हेच बहीण भाऊ एकमेकांना पोट धरून हसवतात तर कधी रडवतात पण यांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम कधीही बदलत नाही.

पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या रक्षाबंधननिमित्त असे अनेक बहिण भावाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही मजेशीर व्हिडीओ खालीलप्रमाणे-

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच
Emotional video toddlers struggle to help family to work in garage heart touching video
आईशिवाय घर अपुरं अन् बापाशिवाय आयुष्य…कुटुंबातून बाप गेल्यावर काय परिस्थिती होते बघाच; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Boy hold poster of fathers love in front of school video goes viral
VIDEO: शाळेबाहेर तरुणानं झळकवली अशी पाटी की लहान मुलेही थांबून विचार करायला लागली; पाटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण सांगतो, “ही रिल सर्व बहिण भावासाठी आहे. बहीण भाऊ एकमेकांसाठी जीव देतील, बहीण भाऊ एकमेकांसाठी जीव देतील पण जेवताना उठून मात्र एक ग्लास पाणी कधीच देणार नाही. भावांनो आपल्या बहिणीला शेअर करा आणि बहिणींनो आपल्या भावांना शेअर करा आणि किती सत्य आहे ना, हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा.” या व्हिडीओवर लिहिलेय, “घर घर की कहाणी. भाऊ आणि बहिणीचे आंबट सत्य”

या व्हिडीओमध्ये बहिण भावाला विचारते, “रक्षाबंधनला काय गिफ्ट देणार?” त्यानंतर व्हिडीओमध्ये भाऊ हातात वाटी घेऊन भिकारीच्या लूकमध्ये दिसतो आणि एक डायलॉग म्हणतो, “अरे हम तो गरीब है, एक गरीब किसी को क्या दे सकता है.. हम जैसे लोक गरीब पैदा होते है और गरीब मर जाते है ..” यावर बहिणीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असते.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर पाणी साचलेले दिसेल आणि साचलेल्या पाण्यात बघत एक भाऊ बहिणीला हाका मारतो आणि तिला म्हणतो, “लवकर ये येथे साप आहे” बहीण येते आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नीट बघते. त्यासाठी ती खाली वाकते. तेव्हा अचानक भाऊ जोरात पाण्यात दगड फेकतो आणि पाणी बहि‍णीच्या चेहऱ्यावर उडते आणि त्यानंतर भाऊ पळत सुटतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

हेही वाचा : Banana Leaf : केळीच्या पानांच्या प्लेट्स कशा बनवल्या जातात माहिती आहे का? VIDEO तून पाहा झलक; नेटकरी म्हणाले, ‘प्लास्टिकच्या…’

या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघेही बहिण भाऊ एका ठिकाणी उभे असतात. तेव्हा बहीण एका तरुणीला विचारते, “ताई तु माझ्या भावाच्या कधी प्रेमात पडली?” त्यावर तरुणी म्हणते, “जेव्हा माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती.” त्यानंतर बहि‍णीला हसू आवरत नाही आणि हसते. बहि‍णीला हसताना पाहून भाऊ तिला मारताना दिसतो.

या व्हिडीओमध्ये भाऊ कपाटातून एक शर्ट काढतो आणि बहिणीला विचारतो, “ताई बघ मी हे शर्ट घालतोय..” त्यानंतर दुसऱ्या क्षणात बहीणीने हे शर्ट घातलेले दिसते आणि भाऊ बघतच राहतो.

या व्हिडीओमध्ये बहिणकॉलेजमध्ये सोडून देण्यासाठी भावाला विनंती करते पण भाऊ थेट नाही म्हणतो. त्यानंतर बहीण म्हणते, “पटकन चल, सौम्या वाट पाहत असेल.” हे ऐकून पुढच्या क्षणी भाऊ तयार होऊन बहिणीपुढे उभा राहतो आणि बहिणीला म्हणतो, “सौम्याला वाट पाहू देऊ शकत नाही.” हे पाहून बहीण सुद्धा अवाक् होते.

सोशल मीडियावर असे अनेक बहीण भावाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक हसण्याचे इमोजी शेअर करत आहे. एवढंच काय तर हे व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या बहीण भावाची आठवण येत आहे.