VIRAL VIDEO : रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल जेव्हा चिकन करी बनवतात…

दोन वर्षापुर्वी लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गावून रातोरात स्टार बनलेल्या रानू मंडल आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत. खूप कमी लोकांना माहित असेल की रानू मंडल यांना गाण्याप्रमाणेच जेवण बनवण्याची देखील आवड आहे. हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

ranu-mondal-chicken-curry-viral-video
(Photo: Youtube/ Rondhon Porichoy)

दोन वर्षापुर्वी लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गावून रातोरात स्टार बनलेल्या रानू मंडल आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे वेगवेगळे गाणे देखील व्हायरल होत आहेत. पण खूप कमी लोकांना माहित असेल की रानू मंडल यांना गाण्याप्रमाणेच जेवण बनवण्याची देखील आवड आहे. हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. सध्या रानू मंडल चिकन करी बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केलीय.

पश्चिम बंगालच्या एका युट्यूबरने रानू मंडल यांच्यासोबत एक व्हिडीओ शूट केलाय. रोंधोन पोरिचॉय नावाच्या युट्यूबरने रानू मंडल यांच्या रानाघाटच्या बेगोपारा इथल्या घरी जाऊन हा व्हिडीओ शूट केलाय. यावेळी रानू मंडल यांनी युट्यूबर रोंधोनसोबत बऱ्याच गप्पागोष्टी केल्या. आतापर्यंत आपल्या गाण्याची जादू दाखवणाऱ्या रानू मंडल यांनी त्यांची कुकींगची जादू दाखवली. यासाठीचा किराणा माल घेण्यासाठी यु्ट्यूबर स्वतः बाजारात गेला होता. खरं तर, त्याने रानू मंडलसाठी काही क्रॉकरी देखील खरेदी केली आणि तिला भेट दिली.

या व्हिडीओमध्ये रानू मंडल चिकन करी बनवताना दिसून येत आहेत. इतकंच काय तर युट्यूबर रोंधोनसोबत त्या जेवायला सुद्धा बसल्या. या व्हिडीओमध्ये रानू मंडल यांनी साडी परिधान केली होती. रानू मंडल यांनी गाणं गाण्याची संधी सोडली असं कधी झालंय का? यावेळेलाही रानू मंडल यांनी चिकन करी बनवता बनवता गाणं गावून आपल्या जादूई आवाजाची झलक दाखवली. ‘जब कोई बात बिगड़ जाए..’ हे गाणं गाताना रानू मंडल यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.

आणखी वाचा : OMG! उकळत्या तेलात हात घालून हा बनवतो फ्राइड चिकन; विश्वास बसत नाही तर पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अभी ना जाओ छोड कर पर…; बाप-लेकीचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आता रानू यांचं कुकींगसोबत गायलेलं हे गाणं सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला पाच लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स शेअर करण्यात सुरूवात केली.

दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर रानू मंडलने लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गायिले होते. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या रातोरात स्टार झाल्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. हिमेश रेशमिया यांनी त्यांच्या गायनाचं कौतुक करून ‘हॅपी हार्डी’ आणि ‘हीर’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. यानंतर त्यांना अनेक चित्रपटात गाणे गाण्याची ऑफर मिळाली. परंतु, दरम्यान रानू मंडल अचानक गायब झाल्या. त्यानंतर आता नव नवे व्हिडीओ समोर येत असल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranu mondal cooks chicken curry with youtuber at her ranaghat home in viral video internet reacts prp