पोलीस कर्मचाऱ्याने सादर केला तुफान रॅप; नेटकरी म्हणतात “हा तर Eminem चाही बाप”

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांकरून पसंती मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी रॅप करताना दिसत आहे. (Photo : Instagram/@vvekverma)

आपल्या देशात टॅलेंटची कमी नाही. सोशल मीडिया आल्यापासून तर लोकांना एक नवे माध्यम उपलब्ध झाले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये लोक आपले कलागुण सर्वांसमोर सादर करतात. अशा लोकांना सोशल मीडियावर पसंत केले जाते. गेल्या काही दिवसांपासून असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांकरून पसंती मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी रॅप करताना दिसत आहे. पोलीस व्हॅनमध्ये बसून तो एखाद्या स्टार रॅपरप्रमाणे त्याच्या रॅपचा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. या व्हिडीओला लोकांची खूप पसंती मिळत आहे.

दिवसरात्र जनतेची सेवा करणारे पोलीस कर्मचारी मनोरंजनासाठी असे काही करतात, जे नंतर इंटरनेटवर व्हायरल होते आणि लोकांनाही ते खूप आवडते. सोशल मीडियाच्या युगात आपली गोष्ट जगाला सांगण्यासाठी लोक रॅपचा आधार घेतात. सध्या या पोलीस कर्मचाऱ्याच्या रॅपमधून त्याची कहाणी स्पष्ट होत आहे. त्याने आपल्या रॅपमधून आपल्या घरापासून बाहेरील सर्व समस्यांबद्दल लोकांना अगदी सहजपणे सांगितले आहे.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

विवेक वर्मा नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यानंतर हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने हिंदी आणि इंग्रजी भाषांचा संगम करून हा रॅप सादर केला आहे. या रॅपने लोकांची मनं जिंकली आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक करत आहेत. तसेच नेटकरी आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘हा तर एमिनेमपेक्षाही उत्कृष्ट आहे.” मिळालेल्या माहितीनुसार या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव जीवन कुमार आहे. ते जम्मू पोलिसांत आपली सेवा देत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rap presented by police officer netizens says he is eminem father pvp

Next Story
आश्चर्य! लग्नात नवरीचा मुलगा अचानक आला समोर, मग काय झालं पाहा हा VIRAL VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी