Whale fish video: समुद्रातील जैवविविता आपल्या सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. विशाल समुद्रात मुंगीच्या आकाराएवढे जीव, तसेच थेट ५० टनांपर्यंतचे देवमासेसुद्धा असतात हे आपल्याला माहीत आहे. देवमासा हा समुद्रातील सर्वांत मोठा मासा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याला पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. मात्र, त्या माशापासून आपल्याला धोकाही तितकाच असतो, कारण एका क्षणात तो आपल्याला संपवण्याची, गिळून टाकण्याची ताकद ठेवतो.दरम्यान, सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे
आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मग ती आई कोणाचीही असो अगदी प्राण्यांचीही पण आईचं प्रेम हे बदलत नाही. आई-मुलाचं हे नातं फक्त मानवांपुरतंच मर्यादित नसून प्राणी, पक्षी आणि माशांमध्येही हे नातं तितकंच घट्ट असतं. अलिकडेच सोशल मिडियावर यासंबंधित एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक देवमासा म्हणजेच मादी व्हेल आपल्या पिल्लाला पाण्याच्या तळाशी दूध पाजताना दिसून आली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, पाण्याच्या खोल आत मादी व्हेल मासा आणि तिचे पिल्लू आहे. आईचं दूध पिण्याची माशांचीही प्रक्रिया काहीशी वेगळी असल्याचे व्हिडिओत दिसले. महासागरात, जिथे त्यांना पाण्याने वेढलेले आहे अशा परिसरात आपल्या बाळाला दूध पाजणे काहीसे कठीण आहे आणि म्हणूनच एक अनोखी पद्धत व्हेल मासे अवलंबत असल्याचे दिसून आले. यात दिसले की, मादी व्हेल प्रचंड दाबाने आपल्या शरीरातून दूध बाहेर काढते जे बरोबर खाली असलेल्या बाळाच्या तोंडात जाते. पिल्लू दूध न ओढताच त्याच्या तोंडात दूध बरोबर पोहचते. मुख्य म्हणजे यावेळी हे दूध पाण्यास मिसळले जात नाही. तज्ञांच्या मते, व्हेलचे दूध सामान्य दुधापेक्षा खूप जास्त स्निग्ध आणि घट्ट असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे पिलांना वेगाने वाढण्यास आणि थंड सागरी वातावरणात टिकून राहण्यास मदत होते.
पाहा व्हिडीओ
व्हेल माशाला असे दूध पाजताना पाहून यूजर्स थक्क झाले तर अनेकांनी घटनेवर आपले आश्चर्य व्यक्त केले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
