स्कुटीवरील नियंत्रण सुटले अन् ती थेट गेटलाच लटकली; नेटकरी म्हणाले 'पापा की परी...' | Rash Driving Road Accident Girl hits scooter on gate video goes viral | Loksatta

स्कुटीवरील नियंत्रण सुटले अन् ती थेट गेटलाच लटकली; नेटकरी म्हणाले ‘पापा की परी…’

स्कूटरवरचे नियंत्रण सुटताच काय झाले एकदा पाहाच

स्कुटीवरील नियंत्रण सुटले अन् ती थेट गेटलाच लटकली; नेटकरी म्हणाले ‘पापा की परी…’
स्कूटर चालू करण्याचा प्रयत्न करताना झालेला हा अपघात सध्या व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर व्हायरल झालेले अपघाताचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला अधिक सावध राहण्याचा इशारा करणारे तर काही पोट धरून हसायला लावणारे असतात. एखाद्या लहानश्या चुकीमुळे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि हास्यास्पद प्रकार घडलेला तुम्ही पाहिला असेल. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी स्कूटर वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तेव्हाच चुकून स्कुटरवरील नियंत्रण सुटते आणि स्कूटर थेट पुढे असणाऱ्या गेटवर जाऊन लटकते. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा

व्हायरल व्हिडीओ:

व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले असून, या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 18:05 IST
Next Story
बायकोच्या मृत्यूनंतर टॅक्सी चालकाने असं काही केलं की…, रात्रीत बनला करोडपती