Lok Sabha Elections Final Result 2024 : भारत- पाकिस्तान यांच्यांतील क्रिकेट सामन्यानंतर तुम्ही टीव्ही तोडल्याची घटना ऐकल्या असतील. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुक निकालानंतरही संतापलेल्या समर्थकांनी टीव्ही फोडल्याची घटना समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी ४०० चा आकडा पार करु शकली नाही, यावरुन संतापलेल्या समर्थकाने थेट कार्यालयातील टीव्ही तोडून टाकला. इतकेच नाही तर नंतर आग लावून पेटवून दिला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचा सांगितले जात आहे. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सपाने राज्यात ३७ जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला केवळ ३३ जागा जिंकता आल्या. अशा परिस्थिती राष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद पराशर हे भाजपला घोषणा दिल्याप्रमाणे ४०० जागा पार न करता आल्याने ते संतापले, यावेळी निकाल पाहत असतानाच त्यांनी भिंतीवर टीव्ही काढून फोडून टाकला, इतकेच नाही तर नंतर आग लावून पेटवून दिली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राष्ट्रीय हिंदू परिषदेच अध्यक्ष गोविंद पराशर निकाल पाहिल्यानंतर निराश होत टीव्ही सेट तोडताना दिसत आहेत. पराशर भिंतीवरून टीव्ही सेट काढून जमिनीवर फेकताना दिसत आहे, यावेळी इतर दोन लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते कोणाचेही न ऐकता टीव्ही धरुन थेट जमिनीवर आपटतात. यानंतर आग लावून पेटवून देतात. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

“चंद्राबाबू खुर्चीत बसाच,” मोदींनी धरला हट्ट; मंचावर नेमकं घडलं काय? ‘तो’ video पाहिला का?

देशात NDA आघाडी विक्रमी ४०० जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्तेवर येईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांनी केला. या दाव्यांचे समर्थन विविध एक्झिट पोलच्या अंदाजांद्वारे करण्यात आले होते ज्यात दावा करण्यात आला होता की, निवडणुकीत एनडीए आघाडी लोकसभेच्या ४०० जागा पार करेल. पण भाजपाने दिलेल्या घोषणेप्रमाणे ते ४०० चा आकडा पार करू शकले नाही.

ट्रेंडमध्ये असे दिसून आले की, एनडीए आघाडी केवळ २९० जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे आणि इतर १८ जागांवर आघाडीवर आहेत.