सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. त्यामुळे कोणता व्हिडीओला कधी कशी पसंती मिळेल सांगता येत नाही. पण साप आणि वन्यप्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीबद्दल कायमच कुतुहूल असतं. त्यांची शिकार करण्याची पद्धत आणि भक्ष्य मिळवण्याची धडपड सोशल मीडियामुळे सहज पाहता येते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक उंदीर मृत्यूच्या वेशीवर असताना सापाला भिडताना दिसत आहे. साधारणत: साप उंदराची सहज शिकार करून गिळून टाकतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक उंदीर सापाला सहजासहजी आपली शिकार करू देत नाही. मात्र या व्हिडीओत उंदीर सापाला शिकार करण्याची संधी देताना दिसत नाही. साप फणा करून उंदराला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र उंदीर न घाबरता सापाचा सामना करत आहे. इकडेतिकडे उड्या मारून सापाचा वार चुकवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसेच सापाची मान पकडून चावा घेताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओला लाइक्स करत व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.