Ratan Tata News: टाटा नॅनोमध्ये बसून VVIP ट्रिटमेंट न घेता रतन टाटा पोहोचले ताज हॉटेलला

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या साधेपणाचं उदाहरण देणारा आणखी एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय.

Ratan-Tata-Viral-Video
(Photo: Instagram/ viralbhayani )

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. रतन टाटांच्या नम्रता आणि साधेपणाचे किस्से आपण वेळोवेळी ऐकत आणि पाहत आलो आहोत. आता सोशल मीडियावर त्यांचा आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दिग्गज उद्योगपती एका छोट्या कार नॅनोमध्ये कोणतीही VVIP ट्रिटमेंट न घेता बसले आहेत. या व्हिडीओमध्ये रतन टाटा कोणत्याही बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमधून प्रवास करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एकीकडे सामान्य माणसालाही स्वतःसाठी महागडी आणि आलिशान कार घ्यायची इच्छा असते, तर दुसरीकडे कोट्यवधींची संपत्ती असलेले रतन टाटा नॅनोमध्ये फिरत आहेत. सोशल मीडियावर युजर्सकडून या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रतन टाटा कोणत्याही बॉडीगार्डशिवाय पांढऱ्या नॅनोमध्ये मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पोहोचताना दिसत आहेत. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचारी त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जाताला दिसून आले. टाटा नॅनो ही फॅन्सी कार नाही आणि ती फारशी पसंत केली जात नाही. पण रतन टाटा हे एका साध्या नॅनो कारमधून ताज हॉटेलला आलेले पाहून नेटिझन्स आणखी त्यांच्या प्रेमात पडले आहेत. यासोबतच चाहत्यांना रतन टाटांच्या साधेपणाचीही खात्री पटली आहे.

आणखी वाचा : राहुल द्रविडच्या साधेपणावर फिदा झाले फॅन्स, बुक लॉंचच्या कार्यक्रमात शेवटच्या रांगेत बसलेला फोटो VIRAL

विरल भयानी यांनी व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘आमच्या फॉलोअर्सपैकी एक असलेल्या बाबा खान यांनी रतन टाटा यांना ताज हॉटेलच्या बाहेर पाहिले. रतन टाटा यांचा साधेपणा पाहून आश्चर्यचकित झाल्याचे बाबांनी सांगितले. कारण त्यांच्यासोबत कोणीही बॉडीगार्ड नव्हता, फक्त हॉटेलचे कर्मचारी आणि रतन टाटा त्यांच्या छोट्या कार टाटा नॅनोमध्ये बसलेले दिसून आले होते.’

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका सीगलने चक्क सुपरमार्केटमधून केली चोरी, २९ हजार रूपयांचे खाद्यपदार्थ चोचीत घेऊन झाला भुर्रर्र

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इथे आहे जगातील सर्वात मोठा माठ, किती पाणी भरत असेल यात? पाहा VIRAL PHOTO

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. तर या व्हिडीओला तब्बल १.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी रतन टाटा यांच्या साधेपणाचं कौतुक करत वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ratan tata arrived at hotel taj in mumbai from nano people watching the video said people are connected to the land prp

Next Story
इथे आहे जगातील सर्वात मोठा माठ, किती पाणी भरत असेल यात? पाहा VIRAL PHOTO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी