टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचा आज वाढदिवस. आज रतन टाटांनी वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण केलं. रतन टाटांच्या वाढदिवसानिमित्तमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत पेजवरुन त्यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मनसेच्या फेसबुक पेजवरुन रतन टाटा आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंचा एक फोटो शेअर करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

मनसेच्या ‘मनसे वृत्तांत अधिकृत’ या व्हेरिफाइड फेसबुक पेजवरुन रतन टाटांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे रतन टाटांच्या पाया पडतानाचा दिसत आहेत. तर रतन टाटा राज यांच्या खांद्याला धरुन त्यांनी केलेला नमस्कार स्वीकारत आहेत. राज आणि टाटांचा हा जुना फोटो शेअर करत मनसेनं, “ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे महान व्यक्तिमत्व आदरणीय रतन टाटा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,” असं म्हणत शुभेच्छा दिल्यात. या वाक्याच्या शेवटी मनसेंन हार्टचा इमोजीही वापरला आहे.

dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र आहेत. जे.आर.डी. टाटा हे ‘टाटा सन्स’च्या चेअरमन पदावरून १९९१ साली निवृत्त झाले. त्यानंतर कंपनीच्या चेअरमनपदाची जबाबदारी रतन टाटा यांच्या खांद्यावर आली. यानंतर टाटा सन्सने प्रगतीची अनेक शिखरं गाठली. त्याला रतन टाटांची मेहनतच कारणीभूत आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा समुहाने अन्य कित्येक कंपन्यांचं अधिग्रहण केलं. ‘टाटा टी’ या कंपनीने ‘टेटले’ कंपनीला, ‘टाटा मोटर्स’ने ‘जॅग्वार लँड रोव्हर’ला , आणि ‘टाटा स्टील’ने ‘कोरस’ कंपनीचं अधिग्रहण केलं. २००४ साली ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ शेअर बाजारात लिस्ट झाली.

यशस्वी उद्योजक, दूरदृष्टी व्यक्ती, देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे.