RATAN TATA: देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्यांचे नाव आदराने घेतात. कोट्यावधीचा व्यवसायाचे मालक असलेले रतन टाटा त्यांच्या माणुसकीसाठी देखील ओळखले जात होते.

रतन टाटा संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहचले

रतन टाटा यांचे पूर्ण नाव रतन नवल टाटा आहे. ते ८६ वर्षांचे होते. २८ डिसेंबर १९३७ रोजी जन्म झाला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे नातू आहेत. रतन टाटा यांनी त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने असे काम केले आहे जे प्रत्येकाला करणे शक्य नव्हते. आपल्या संघर्षामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहचले आहेत.

Actor Sachin Pilgaonkar is coming to Yavatmal on Wednesday to appreciate Geet Ranjan
यवतमाळकर स्वरकन्येच्या सत्काराला अभिनेता सचिन येणार
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर!…
Sankarshan Karhade Political Poem video viral
छत्रपती शिवाजी महाराजांकडे गृहखातं, तर तुकोबा अर्थमंत्री…; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कवितेतून पांडुरंगाला साद, व्हिडीओ व्हायरल
Siddhi Kadam Withdraw Mohol
Siddhi Kadam : मोहोळमधून रमेश कदम आणि सिद्धी कदम यांची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राजू खरेंना दिलासा
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Kolkata’s chess star Anish Sarkar impresses Anand Mahindra
कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
Rishi Kapoor would have killed himself
…तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य

हेही वाचा – १६५ कोटीं खर्च करून पाळीव प्राण्यांसाठी पहिले हॉस्पिटल! प्राणी प्रेमी रतन टाटा यांचा शेवटचा प्रकल्प…

रतन टाटा यांचे १० आदर्श विचार

रतन टाटा यांचे आदर्श, विचार आणि सिद्धांत तरुणी पिढीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. रतन टाटा यांचे १० प्रेरणादायी विचार जाणून घेऊ या जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रेरणा देतील.

हेही वाचा –VIDEO: टाटांचा श्वास थांबला अन् गरब्यातील सळसळती पावलंही; निधनाची बातमी ऐकताच मुंबईकरांनी अक्षरश: हात जोड

रतन टाटा यांचे १० प्रेरणादायी विचार

  • “आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ECGमध्ये सरळ रेषेचा अर्थ असतो आपण जीवंन नाही”
  • “सत्ता आणि पैसा हे माझे सिद्धांत नाही”
  • “जर तुम्हाला वेगात चालायचे असेल तर एकटे चालत राहा पण तुम्हाला दुरपर्यंत चालायचे असेल तर इतरांच्या बरोबर चाला.”
  • लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्याला त्याच गंज नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला इतर कोणीही नष्ट करू शकत नाही त्याला त्याची मानसिकता नष्ट करते.
  • लोक तुमच्यावर दगड फेकत असतील तर ते उचला आणि त्याचा वापर एक स्मारक तयार करण्यासाठी करा.
  • मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही मी निर्णय घेतो आणि नंतर तो योग्य करून दाखवतो.
  • ज्या दिवशी मी उडण्यास सक्षम नसेल तो दिवस माझ्यासाठी अत्यंत दुखी दिवस असेल.
  • शेवटी आपल्याला अशा संधीसाठी पश्चाताप होतो ज्या आपण गमावतो. प्रत्येक छोटी संधी तुम्हाला मोठे बनवू शकते.
  • सर्वात मोठे अपयश प्रयत्न न करणे हे आहे
  • गोष्टी नशिबावर सोडण्यावर माझा विश्वास नाही. माझा कठोर परिश्रम आणि तयारीवर विश्वास आहे.