“मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यापेक्षा…”; भारतीय पालकांना ऑलिम्पिक गाजवणाऱ्या महिला हॉकीपटूचा सल्ला

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने भारतीय पालकांसाठी मुलींच्या लग्नाविषयी अतिशय महत्त्वाची पोस्ट केली आहे.

rani rampal
राणी रामपालची खास पोस्ट व्हायरल (फोटो: @imranirampal / Twitter )

भारतीय महिला हॉकी संघाची २५ वर्षीय कर्णधार राणी रामपाल केवळ मैदानातील तिच्या कामगिरीसह तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमीच काही तरी चांगलं, प्रेरित करणारा संदेश ती देत असते. तिने आज सकाळी मुलींच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तिच स्पष्ट मत व्यक्त करणारा एक मेसेज पोस्ट केला आहे. दरम्यान सामंथा रुथ प्रभूने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्न आणि मुलींबद्दल एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे पोस्ट?

राणी रामपालने काल २७ ऑक्टोबरला तिच्या ट्विटर अंकाउंट वरून शेअर केलेल्या मेसेजमध्ये लिहले की, “तुमच्या मुलीला इतके सक्षम बनवा की, तिचे लग्न कोणाशी होईल याची काळजी करण्याची गरज नाही. तिच्या लग्नाच्या दिवसासाठी पैसे वाचवण्याऐवजी, तिच्या शिक्षणावर खर्च करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला लग्नासाठी तयार करण्याऐवजी स्वतःसाठी तयार करा. त्याला आत्म-प्रेम, आत्मविश्वास द्यायला शिकवा”

( हे ही वाचा: YouTube च्या मदतीने तिने घरीच केली स्वत:ची प्रसूती; एकाच घरात राहून पालकांनाही कळलं नाही )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या पोस्टला आतापर्यंत २० हजारून जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकांनी ही पोस्ट रीपोस्टही केली आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी राणीला सपोर्ट केला आहे.

नेटीझन्सने केलेल्या कमेंट्सवरून राणी रामपालच्या पोस्टशी अनेकजण सहमत असल्याचे दिसून येते. तिची ही पोस्ट म्हणजे अनेकांना लग्न आणि मुलींबद्दल एक प्रेरणादायी मेसेज वाटतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rather than saving money for a girls wedding advice to indian parents on winning olympic hockey ttg

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या