जेव्हा एखाद्या घरात साप आढळून येतो तेव्हा तिथल्या आजूबाजूचं वातावरण भयावह बनतं. पण कल्पना करा की एखाद्या घरातून जर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ९० हून अधिक साप लागोपाठ घराबाहेर येत राहिले तर त्या कुटुंबाचं काय होईल? केवळ कल्पनाच केली तरी अंगावर शहारे येऊ लागतात, पण ही घटना प्रत्यक्षात घडलीय. उत्तर कॅलिफोर्नियातील एका घरात ९० हून अधिक साप आढळून आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने साप आपल्या घरातून बाहेर पडताना पाहून घरात राहणारी महिला सुद्धा आश्चर्यचकित झाली.

या महिलेच्या घरातून जे साप बाहेर पडले आहेत त्यांना ‘रॅटलस्नेक’ म्हणतात. या जाचीचे साप अत्यंत धोकादायक असतात आणि हे साप चावल्यानंतर व्यक्तीचा एका तासाच्या आत मृत्यू होऊ शकतो. आपल्या घराखाली इतके साप असल्याचे पाहून महिलेने सुरूवातीला ‘सोनामा काउंटी रेप्टाइल रेस्क्यू’ नावाच्या संस्थेला बोलावलं. बचाव पथकाच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर सांता रोझा इथल्या घरातून तब्बल ९२ हून अधिक हे विषारी साप बाहेर काढले.

फेसबुकवर व्हायरल होतोय फोटो

‘सोनामा काउंटी रेप्टाइल रेस्क्यू’च्या पथकाने त्यांच्या संघटनेच्या फेसबुक पेजवर या मदत कार्याचे काही फोटोज शेअर केली आहेत. घरातून बाहेर पडलेल्या ९२ हून अधिक सापांना पकडण्यात यश मिळवल्यानंतर त्यांनी हे फोटोज क्लिक केले. त्यानंतर एकाच घरात इतके सारे साप आढळून आल्याचं पाहून हे फोटोज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. फोटो शेअर करताना टीमने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मला एक फोन आला, ज्यात कोणीतरी सांगितलं की त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात साप बाहेर आले आहेत. ३ तास ४५ मिनिटांनंतर, मी त्या ९० हून अधिक सापांना घेऊन त्यांच्या घराबाहेर आलो. यानंतर, कमेंट्स सेक्शनमध्ये संस्थेने आणखी माहिती देत लिहिलं की, “२२ प्रौढ साप आणि ५९ सापांची पिल्ले सापडली आहेत. मी त्या घरी आणखी बऱ्याचदा जाईन आणि या महिन्याच्या १५ तारखेपूर्वी आणखी तपासणी करेल.”

संस्थेच्या संचालकांनी सर्व घटनाक्रम सांगितला

‘सोनामा काउंटी रेप्टाइल रेस्क्यू’ ऑर्गनायझेशनचे संचालक वुल्फ यांनी सांगितलं की, “जेव्हा मला रॅटलस्नेक सापडले तेव्हा मी घराच्या खाली तपास करत होतो. त्यानंतर मला उजव्या बाजुने एक साप दिसला. मग दुसरा आणि नंतर तिसरा. हे पाहून मला धक्काच बसला. बाहेर येताना, मी दोन बादल्या घेतल्या, स्तःच्या संरक्षणासाठी हातमोजे घातले आणि साप पकडण्यासाठी आत गेलो. वुल्फ म्हणतात की, “मी पुढचे चार तास साप शोधत राहिलो. मला वाटतं की योग्य वेळी कॉल केल्यामुळे टीम सापांना पकडण्यात यशस्वी झाली, जी माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. जेव्हा आपण कोळ्यांच्या जाळ्या आणि घाणी मधून जाता, तेव्हा आपण घाणेरडे होतो, त्या वेळी एक दुर्गंधी येते, कपडे देखील घाण होतात, तरीही हे प्रकारे चांगलंच आहे.”

वुल्फ यांनी सांगितलं की,”जेव्हा पहिल्यांदा त्या घरात पोहोचलो तेव्हा २४ प्रौढ साप आणि ५९ सापाच्या पिल्लांना २४ इंचाच्या एका रॉडच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर आणखी ११ विषारी साप पकडण्यात यश आले आहे.”

‘रॅटलस्नेक्स’बद्दल या गोष्टी जाणून घ्या

‘सोनामा काउंटी रेप्टाइल रेस्क्यू’ संघटनेचे संचालक वुल्फ म्हणाले की, उत्तर कॅलिफोर्नियामध्ये हे साप अतिशय प्राणघातक आहेत. सहसा ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान हे साप लपण्यासाठी आणि झोपायला खडकांखाली किंवा गरम जागा शोधतात. एव्हढंच नव्हे तर येथून निघून गेल्यावर हे साप वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी परततात. अशा सापांना बऱ्याचदा स्वतःसाठी खडकासारखी जागा हवी असते. कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम असतं. त्याच वेळी, पक्की घरे त्यांना खडकांपेक्षा अधिक संरक्षण देतात आणि विशेषतः जेव्हा हिवाळ्याची वेळ असते. हिवाळ्यात, त्यांना आवश्यक उबदारपणा आणि संरक्षण फक्त पक्क्या घरांमध्ये मिळतं.