रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जला मात देत पहिला आयपीएल विजय मिळवल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. रॉयल चॅलेंजर्सच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र सुरु आहे. या विजयानंतर विराट कोहली भावूक झालेला क्षण, पत्नी अनुष्काबरोबरचा भावूक क्षण, रॉयल चॅलेंजर्स संघाने ट्रॉफी उचलताना क्षण, विजयनंतर आनंदाने नाचनाचा क्षण ….या विविध घटनांटे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेला आणखी एक क्षण आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून त्यांचा पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली, ज्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. बंगळुरूमध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी इतका जल्लोष केला ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पुण्यातही आरसीबीच्या चाहत्यांनी एफसी रोडवर येऊ विजयाचा जल्लोष केला.
RCBच्या अंतिम फेरीतील विजयाचा शेवटचा क्षण पाहण्यासाठी लग्न थांबवले
सामन्यात शेवटचा चेंडू बाकी असताना कॅमेरा आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर झूम झाला, ज्याने त्याचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा असताना सर्वत्र बारकाईने पाहिले. पंजाब किंग्जला शेवटच्या चेंडूवर १२ धावांची आवश्यकता असल्याने, आरसीबीचा विजय जवळजवळ निश्चित होता. शशांक सिंगने षटकार मारण्यात यश मिळवले असले तरी निकाल आरसीबीच्या बाजूने लागला…..आरसीबीने त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकताच गर्दीने मोठा जल्लोष केला. हे सर्व जण काही चाहते मोठ्या स्क्रीनवर पाहत होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे दृश्य लग्नातील होते. चाहत्यांनी लग्न समारंभ थांबवून सामना पाहतानाचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा Viral Video
नवरा-नवरी सोडून सामना पाहत बसले पाहुणे
व्हिडीओमध्ये चक्क नवरा नवरी लग्न सोडून सामना पाहताना दिसत आहेत. रात्री उशिरापर्यंत लग्नसोहळा सुरू होता त्याचवेळी आयपीएलचा सामना सुरू होता. लग्नमंडपात स्क्रिनवर मॅच सुरू असल्याचे दिसते. जिथे लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे नवरा नवरी नव्हे तर सामना पाहात होते. आरसीबीने सामना जिंकताच सर्वांनी एकच जल्लोष केला. लग्न सोहळ्यातीला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ निखिल प्रभाकर नावाच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”मी एका लग्नात आहे, लोकांनी RCBच्या अंतिम फेरीतील विजयाचा शेवटचा क्षण पाहण्यासाठी लग्न थांबवले! #RCBvsPBKS #EeSalaCupNamde”
अंतिम सामन्यात, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्यानंतर सहा धावांनी विजय मिळवला. जरी या हंगामात अहमदाबादमध्ये पाहिलेल्या उच्चांकी धावसंख्येपेक्षा ही धावसंख्या कमी असली तरी, आरसीबीच्या उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीमुळे या महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवण्यात मदत झाली.