Reel Shocking Video : आजकाल रील्स बनवण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोक जीवाचीही परवा करत नाहीत. ट्रेन, बस, बाईक जिथे जागा दिसेल तिथे उभे राहून व्हिडीओ शूट करू लागतात. यात अनेकदा अपघाताच्या घटना घडतात तरी लोक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. सध्या अशाच एका रीलसाठी जीवघेणा प्रकार समोर आला आहे, ज्यात एक तरुण रीलसाठी चक्क दलदलीत उडी मारतो आणि त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही धडकी भरले. या रीलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दलदलीत चालणंही अनेकदा अवघड असतं, कारण त्यातील चिखलात एकदा का कोणी फसला की त्यातून सहसा बाहेर पडणं अवघड असतं. अनेकदा या दलदलीत रुतून मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक तरुण दलदलीत उडी मारून रील शूट करतोय. यासाठी त्याला एक मित्र मदत करताना दिसतोय. तो मुलगा दलदलीच्या काठावरून धावत येतो आणि दुसऱ्या मुलाच्या खांद्यावरून थेट दलदलीत उडी घेतो आणि सरळ त्याची मान जाऊन चिखलात रुतते. त्याचा अशाप्रकारे उडी घेत दलदलीत उभा राहण्याचा विचार होता, पण त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात. अखेर उडी घेताच त्याचे मानेसह अर्ध शरीर चिखलात रुततं. दोन पाय उलटे वर आणि मानेसह अर्ध शरीर चिखलात अशा स्थितीत तो रुतून बसतो. यावेळी त्याला श्वास घेणं अवघड होऊन जातं, त्यामुळे बाहेर पडण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करू लागतो, पण त्याला सर्व अवघड जातं, शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर तो कसा बसा हात पाय मारत बाहेर पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रीलसाठी केलेल्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ rdx_rahish_kumar100k नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत अनेकांनी लाईक केला असून त्यावर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, भाऊ, जेव्हा तुम्हाला हे स्टंट कसे करायचे हे माहीत नसते तेव्हा तुम्ही असे स्टंट का करता? तर दुसऱ्याने लिहिले की, यातून तो स्वत:चे नुकसान करत आहे, दुसरे काही नाही. तिसऱ्याने लिहिले की, स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला की असे होणारचं.