सोशल मीडियावर काय व्हायरल होईल आणि नेटिझन्सना काय पसंत पडेल याची कोणीच कल्पना देऊ शकणार नाही. सध्या सोशल मीडियावर विक्रीला असलेल्या एका फ्रिजचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. आता तुम्ही विचार करत असाल की, फ्रिजचा फोटो व्हायरल होण्यासाठी त्यात विशेष काय आहे? तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या व्हायरल फोटोमध्येच आहे. विक्रीला असलेल्या या फ्रिजचा फोटो पाहून नेटकरी पुरते गोंधळून गेले आहेत. नेटकरी मंडळी या व्हायरल फोटोमध्ये फ्रिजच्या शोधात लागले आहेत.

सोशल मीडियावर या व्हायरल फ्रिजचा फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. फेसबूवर या फ्रिजच्या विक्रीसाठी एक जाहिरात देण्यात आलीय. या जाहिरातीत विक्रीला असलेल्या फ्रिजचा फोटो देखील जोडलाय. विक्रीला असलेल्या फ्रिजची जाहिरात पाहून नेटकरी मंडळी हा फोटो एक दोनदा नव्हे तर वारंवार हा फोटो अगदी निरखून पाहताना दिसून येत आहेत. कारण या फोटोमध्ये सर्व वस्तू दिसून येत आहेत, पण फ्रिज मात्र कुठेच दिसेना. फ्रिज विकण्यासाठी ही जाहिरात आहे, मात्र फ्रिजच कुठे दिसत नसल्याने नेटकऱ्यांचं डोकं चक्रावून गेलं आहे. तुम्हाला कुठे दिसतोय का फ्रिज? हा व्हायरल फोटो एकदा पाहाच.

‘फ्रिज फॉर सेल” अशी कॅप्शन लिहित हा फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. या फोटोला आतापर्यंत सात हजार लोकांनी लाइक केलंय आणि २,३०० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलंय. या फोटोमध्ये फ्रिज नक्की आहे तरी कुठे ? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

हा फोटो अगदी निरखून पाहिला तर लक्षात येईल की फोटोमध्ये फ्रिजचं दिसतोय. पण फ्रिजच्या रिफ्टेक्वीव्ह डोरमुळे त्यावर त्यावर स्वयंपाकघरातील इतर वस्तू, ओव्हन आणि किचनमधील अर्धा भाग हा चमकतोय. त्यामुळे हा फोटो पाहून सुरूवातीला किचन असल्यासारखा भास होतो. पण थोडं आणखी निरखून पाहिलं की कळतं की किचनमधला हा भाग फ्रिजच्या दरवाज्यावर चमकतोय. हे कळल्यानंतर अनेक नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले. तसंच फ्रिजची इतकी स्वच्छता ठेवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, अशी प्रतिक्रिया देखील देताना दिसून येत आहेत.