scorecardresearch

VIRAL VIDEO : नवरी-नवरदेवावर पैसे उडवण्याचा उत्साह नडला, थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडला

लग्न म्हटलं की, नवरा-नवरीशिवाय सर्वात जास्त चर्चा असते ती करवल्यांची. पण सध्या अशा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात करवल्या नाही तर नवरदेवाचे मित्रच चर्चेत आले आहेत.

Groom-Friend-Viral-Video
(Photo: Instagram/ divusharma_9andamitchhaniwala)

लग्न म्हटलं की, नवरा-नवरीशिवाय सर्वात जास्त चर्चा असते ती करवल्यांची. पण सध्या अशा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात करवल्या नाही तर नवरदेवाचे मित्रच चर्चेत आले आहेत. या लग्नात या नवरदेवाच्या मित्रांनी चांगलीच मजा केली आहे. स्टेजवर नवरा-नवरीच्या बाजुला उभं राहून नवरदेवाच्या मित्रांनी असं काही केलं आहे की, त्यावरून कुणाचीच नजर हटत नाही.

लग्नात अनेकदा नवरा-नवरीकडेच सर्वांचं लक्ष असतं. पण या व्हिडीओत तुमचं लक्ष नवरा-नवरी नाही तर थेट त्यांच्याबाजुला असलेल्या मित्रांकडेच जाईल. या मित्रांनी नवरा-नवरीच्या बाजुला उभं राहून जे केलं ते पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. आपल्या मित्राचं लग्न होणार याचा आनंद प्रत्येक मित्राला असतो. प्रत्येक जण तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. पण कदाचित या मित्रांनी जसा आनंद व्यक्त केला असेल तसा क्वचितच कोणत्या तरी मित्रांनी व्यक्त केला असेल. नवरदेवाच्या या मित्रांनी नवरा-नवरीवर अख्खं नोटांचं बंडल उडवलं आहे. पण म्हणतात ना, कधी कधी जोशच्या नादात होश गमावू नये…अगदी असंच काहीसं या नवरदेवाच्या मित्रांसोबत घडलंय. नवरा-नवरीवर पैसे उधळण्याचा हा उत्साह यातल्या एका मित्राला चांगलाच नडला. पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही सारेच जण अगदी पोट धरून हसाल.

आणखी वाचा : Zomato डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL; माउथ ऑरगनने गाणं वाजवून झाला देशभरात फेमस!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरीच्या बाजुला दोन मित्र उभे आहेत. या दोन्ही मित्रांच्या हातात पैशांचा बंडल दिसून येतोय. एकेएके करत हे मित्र आपल्या हातातल्या नोटा धडाधड नवरा-नवरीवर उडवत जातात. त्यानंतर आजूबाजूचे लोकही पाहत राहतात. खूप वेळ हे तरुण असेच पैसे उडवत राहतात. यातल्या एका मित्राच्या हातातल्या नोटा संपल्यानंतर उत्साहाच्या भरात तो नवरदेवाच्या बाजुला खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करतो. पण खुर्चीच्या टोकावर बसताला या मित्राचा तोल बिघडतो आणि थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडतो. नवरदेवाच्या अंगावर जाऊन हा मित्र पार आडवा तिडवा होऊन पडतो. हे दृश्य पाहून बाजुला बसलेल्या नवरीला सुद्धा हसू आवरता आलं नाही.

आणखी वाचा : ‘Kacha Badam’ गाण्याची क्रेझ थेट टांझानियापर्यंत पोहोचली…, ‘त्या’ तरूणाचा डान्स होतोय VIRAL

मित्राची ही करामत पाहून खुर्चीवर बसलेलाल नवरदेव सुद्धा संतापतो. नवरदेवाचा मित्र बिचारा कसा बसा स्वतःला सावरून उठण्याचा प्रयत्न करत असतो, पण संतापाच्या भरात या नवरदेवाने त्याला एक फटका देखील मारला. नवरदेवाचा फटका खाल्ल्यानंतर तो मित्र पुन्हा उठतो आणि पुन्हा त्याच्या बाजुला तो आधी जिथे बसण्याचा प्रयत्न करत होता, पुन्हा तिथेच बसतो. पण नवरदेवाचा राग इतका असतो की, भर स्टेजवर सगळ्यांसमोर तो मित्राला तिथून जाण्यासाठी सांगतो. पण हा मित्र स्वतःची चूक असल्याचं सांगून नवरदेवाला कसं बसं समजावताना दिसून येतोय. हा व्हिडीओ फारच मनोरंजक आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : माशाच्या तोंडात सिरिंज टोचल्यानंतर शेकडो पिल्ले बाहेर पडली! असं दृश्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : राणू मंडलने गायलं ‘Kacha Badam’ गाणं, VIRAL VIDEO पाहिल्यानंतर लोक म्हणाले, ‘सगळा मूड खराब केला’

divusharm_9andamitchhaniwala’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ५३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अत्यंत मजेदार कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ जितका मजेदार आहे, त्याहूनही जास्त या व्हिडीओलाखालील कमेंट्स देखील मजेदार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Report grooms friend falls in his lap during wedding reception watch viral video to know what happened next prp

ताज्या बातम्या