Republic Day 2026: दरवर्षी, प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहत साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. भारतीय राज्यघटनेने देशाला प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणून घोषित केले. दरवर्षी, प्रजासत्ताक दिन हा भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि नैतिक मुल्यांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो आणि आपल्याला आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे आपण कायम ऋणी आहोत त्यांचे स्मरण केले पाहिजे.

Republic Day 2026 Parade: प्रजासत्ताक दिन परेडबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे

  • दरवर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत राजपथावर भव्य परेड पार पडते. राजपथ ज्याला कर्तव्य पथ असेही म्हटले जाते जे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दर्शवते आणि लष्करी पराक्रमाचे शक्तिप्रदर्शन करते. विविध राज्यांची संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथांचेही संचलन पार पडते. प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव तीन दिवस चालतो आणि २८ जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट समारंभाने त्याची समाप्ती होते. विशेष दिवस साजरा करण्यासाठी आपण तयारी करत असताना, प्रजासत्ताक दिनाच्या परेडबद्दल काही रंजक गोष्टी येथे आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे.
  • कर्तव्य पथावर पथसंचलन होते म्हणजे परेडचे सादरीकरण होते. यामध्ये भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंट्स सहभागी होतात.
  • दरवर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्राच्या राज्यकर्त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.
  • प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकवला जातो कारण राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर हे परेड सुरू होते.
  • प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी एक वर्षापूर्वी जुलैमध्ये सुरू होते. सहभागींना त्यांच्या सहभागाची औपचारिक माहिती दिली जाते. परेडच्या दिवशी ते पहाटे ३ वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचतात. तोपर्यंत त्यांनी जवळपास ६०० तास सराव केलेला असतो.
  • ध्वज फडकवल्यानंतर सामुहिक राष्ट्रगीत गायले जाते आणि २१ तोफांची सलामी दिली जाते. बंदुकीची सलामी नेहमी राष्ट्रगीताच्या वेळेशी जुळते. पहिली गोळी राष्ट्रगीत सुरू असताना सोडली जाते आणि त्यानंतरची गोळी ५२ सेकंदांनी सोडली जाते. ज्या तोफांमधून शॉट्स बनवले जातात त्या १९४१ मध्ये बनवल्या गेल्या होत्या आणि सैन्याच्या सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
  • विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून संरक्षण मंत्रालयासमोर आपले वैविध्यपूर्ण चित्ररथ प्रस्तुत केले जातात जे आपल्या राज्याची संस्कृतीचे आणि भिन्नतेचे दर्शन घडवितात. या वर्षी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालये आणि विभागांना चित्ररथसंचलनासाठी निवडण्यात आले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अरुणाचल प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मेघालय, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.