असगर अली आतापर्यंत हयात असलेले कदाचित भारतातील सगळ्यात वृद्ध मतदार होते. वयाच्या १०३ व्या वर्षी त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला होता. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. वयाच्या १०४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

viral video : बंदुकीतून सुटलेली गोळी तोंडात पकडण्याचा स्टंट जादुगाराच्या जीवावर बेतला

असगर अली यांचा जन्म १९१३ साली झाला. भारतातील सर्वात वृद्ध मतदार अशी त्यांची ओळख होती. भारतीयांना वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा हक्क प्राप्त होतो. अलींना वयाच्या १०३ व्या वर्षी तो प्राप्त झाला. त्यामुळे या मतदाराची वेगळीच ओळख होती. पण त्याचबरोबर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांचे नागरिकत्त्व त्यांच्याकडे होते. असगर अली यांचा जन्म कूच बिहारच्या मशालडांगामध्ये झाला. हे गाव पश्चिम बंगाल आणि बिहारच्या सिमेवर होते. पण फाळणीनंतर याचा काही भाग पूर्व पाकिस्तानात गेला. त्यामुळे ते पाकिस्तानी नागरिक झाले. १९७२ मध्ये हा भाग वेगळा होऊन बांगलादेश झाला आणि ते बांगलादेशचे नागरिक झाले. पण २०१५ मध्ये भारत आणि बांगलादेशात भूमि सीमा तडजोड करार झाला. या करारानुसार १४ हजार ८६४ बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व प्राप्त झाले. भारतीय नागरिकत्त्व मिळाल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांत आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

वाचा : नववर्षातील पहिल्या ट्यूना माशावर चक्क ४ कोटींची बोली!

भारतातील सगळ्याच वृद्ध मतदार म्हणून ते ओळखले जायचे. रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. गेल्या शतकभरात ते त्रस्त होते. तिन्ही देशांतील राजकारण आणि वैर यामुळे हक्काचा असा निवारा न मिळू शकल्याची खंत त्यांना होती. पण भारताचे नागरिकत्त्व मिळाल्यानंतर मात्र सुखाचे दिवस आल्याचे त्यांनी सांगितले होते. वयाच्या १०४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.