Jay Pawar & Yugendra Pawar Perform at Revati Sule Sangeet Ceremony: राजकीय वर्तुळातील सर्वात चर्चेत असलेल्या विवाहसोहळ्यांपैकी एक ठरलेल्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. भव्य विवाहसोहळा, दिग्गजांची उपस्थिती, बॉलीवूडची झलक आणि कुटुंबातील आनंदाचे क्षण यामुळे हा सोहळा विशेष ठरला. मात्र, लग्नानंतर आता सोशल मीडियावर एका वेगळ्याच व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण पुन्हा एकदा रेवती सुळेच्या संगीत सोहळ्याकडे वळले आहेत, कारण या कार्यक्रमात असा एक क्षण घडला, ज्याने उपस्थितांचीच नव्हे तर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचीही मने जिंकली. स्टेजवर अचानक सुरू झालेल्या एका खास परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि वातावरणात अक्षरशः उत्साहाची लाट उसळली.

मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला राजकारण, उद्योग, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, संगीत समारंभात घडलेला हा क्षण आता सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला रंगतदार संगीत सुरू होतं आणि त्यानंतर स्टेजवर दिसतात पवार कुटुंबातील दोन तरुण चेहरे.

यापैकी एक जण लोकप्रिय हिंदी गाण्यावर ठेका धरताना दिसतो आणि त्याच्या उत्साही नृत्याने उपस्थितांकडून जोरदार टाळ्या मिळतात. त्यानंतर दुसरा तरुणही स्टेजवर येतो आणि आपल्या अंदाजात नृत्य सादर करत वातावरण आणखी रंगवतो. काही क्षणांतच संपूर्ण सभागृह जल्लोषात बुडाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतं.

या व्हायरल व्हिडीओतील विशेष बाब म्हणजे स्टेजवर नृत्य करणारे हे दोघेही पवार कुटुंबातील सदस्य आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी या संगीत सोहळ्यात नृत्य सादर केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. जय पवार यांनी ‘सोनी दे नखरे’ या गाण्यावर तर युगेंद्र पवार यांनी ‘सुबह होने ना दे’ या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळतं.

रेवती सुळेच्या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थिती लावत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. त्याचबरोबर विविध पक्षांतील अनेक राजकीय नेते, मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्तींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

दरम्यान, संगीत समारंभातील आणखी एक आकर्षण म्हणजे बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान. त्याने आपल्या लोकप्रिय गाण्यावर रंगतदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. रेवती सुळेही त्याच्यासोबत आनंदाने थिरकताना दिसली, त्यामुळे हा संगीत सोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक संस्मरणीय जल्लोष ठरल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्या नृत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून नेटकऱ्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ