बंगळुरूमधील रिक्षाचालकाने विद्यार्थ्यामध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. एक्स ( पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये, बंगळुरूमध्ये इंटर्निंग करणाऱ्या २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने ऑटो-रिक्षा चालकाशी जोरदार वादाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये,रिक्षाचालक ५८० रुपयांची मागणी करताना आणि विद्यार्थी ड्रायव्हरला ऑटो बुकींग ॲपवर किती पैशांचे मागणी होत आहे हे दाखवण्यास सांगत आहे. रिक्षाचालकाने छळ केल्याचा आणि वांशिक अपशब्द (racial slurs) वापरल्याचा आरोप करणारी विद्यार्थ्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.
रिक्षाचालकाने इंटर्न विद्यार्थ्याला त्याच्या कार्यालयाबाहेर मारहाण करण्याची धमकी दिल्याचा दावाही विद्यार्थ्याने केला आहे. “बंगळुरूच्या एका रिक्षा चालकाकडून त्रास दिला गेला आणि धमकावले गेले. मी जेव्हाही जाईन तेव्हा तो मला माझ्या कार्यालयाबाहेर मारहाण करेल, असे त्याने मला सांगितले आहे. आणि जातीय अपशब्द वापरले आणि तो काहीही कारण नसताना २०० रुपये जादा मागत होता. फक्त २० वर्षांचा कॉलेज विद्यार्थी त्याच्या इंटर्नशिपमधून परत येत आहे,” असे पोस्ट मध्ये लिहिले आहे.
पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करताना, तरुणाने पुढे दावा केला की,” त्याने ड्रायव्हरला ५०० रुपये द्यावे लागतील कारण त्याने रिक्षाचालकाने मद्यधुंद मित्रांना बोलावले. “त्याला(ॲपवर दाखवल्याप्रमाणे) ३८० रुपयांऐवजी ५०० रुपये (४००cash + १००) द्यावे लागले तरच मला आणि माझ्या मित्रांना एकटे सोडेल कारण त्याने त्याच्या दोन दारूच्या नशेत असलेल्या मित्रांना बोलावले जे आम्हाला मारहाण करणार होते. सतत आम्हाला अपशब्द ऐकवत होते. त्याने त्यानंतरच्या X पोस्टमध्ये लिहिले.
ही पोस्ट समोर आल्यानंतर लगेचच बंगळुरू पोलिसांनी घटनेची चौकशी केली. “कृपया तुमचा संपर्क क्रमांक आणि घटनेचे ठिकाण DM करा,” असे बंगळुरू शहर पोलिसांच्या अधिकृत हँडलने लिहिले.
हेही वाचा –‘कॉलर पकडली, केस ओढले…ग्राहकाने थेट बँक कर्मचाऱ्याला केली मारहाण, Video होतोय Viral
u
अनेक वापरकर्त्यांनी कमेंट विभागात समान अनुभव शेअर केले. “माझ्या बहिणीबरोबही असेच घडले. भविष्यात होणारा त्रास टाळण्यासाठी ६०० रुपये अतिरिक्त द्यावे लागले,” असे एका वापरकर्त्याने लिहिले. “माझ्यासह गेल्या वर्षी घडलं. काही वेळा मी ऑटो बुक केली. ॲपने जे दाखवले त्यापेक्षा त्या व्यक्तीने २५० रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली,” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली.
“गेल्या वर्षी माझ्याबरोबर अशीच एक घटना घडली होती. भाडे ९८ होते आणि ऑटो चालकाने १५० ची मागणी केली. मी पुन्हा सांगतो, त्याने मागणी केली विनंती नाही. तो माझ्याशी संपूर्ण ३० मिनिटे भांडला. मी त्याचे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली आणि तुमच्या व्हिडिओप्रमाणेच त्याने मला जिथे उचलले होते तिथे सोडण्याची धमकी दिली,” तिसऱ्या वापरकर्त्याने सांगितले.