King Cobra Shocking Stunt Video : सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक किंग कोब्रा सापाबरोबर जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. इंडोनेशियातील प्रसिद्ध सर्पमित्र रिम्बा पेटुआलांग यांनी स्टंटबाजीत सापाबरोबर असं काही केलं पाहूनही तुम्हाला विश्वास ठेवणे खूप कठीण वाटेल.

सापाबरोबर खतरनाक स्टंटबाजी

व्हायरल व्हिडिओमध्ये इंडोनेशियातील प्रसिद्ध ॲनिमल ट्रेनर रिम्बा पेटुआलांग एका भल्यामोठ्या किंग कोब्राबरोबर जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. त्यांचा हा लाईव्ह शो पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ते स्टंट करताना जीवाला धोका निर्माण होईल याचा विचारही करत नाही.

या व्हिडिओमधील सर्वात भीतीदायक भाग म्हणजे जेव्हा रिम्बा किंग कोब्रा फणा आपल्या तोंडाजवळ नेतात आणि त्याला ‘किस’ करण्याचा प्रयत्न करतात. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा ते सापासमोर जमिनीवर पाठीवर झोपले आणि त्या विषारी सापाला थेट आपल्या चेहऱ्यावर उभे केले. थोडीशी चूकसुद्धा त्यांचा जीव घेऊ शकली असती. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनीही श्वास रोखून धरला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “अरे भावा, हा जिवंत आहे की गेला?” दुसऱ्याने प्रार्थना करत लिहिले, “देव याला सुरक्षित ठेवो.” तर एका युजरने कौतुक करत लिहिले, “काय धैर्य आहे, वा! आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.” आणखी एका युजरने मजेशीर शैलीत कमेंट केली, “आजकाल किंग कोबरासुद्धा लोक हलक्यात घेतात.”