टोकियो गेम्समध्ये अ‍ॅथलीट्सना दुसऱ्या खेळाडूसोबत जवळीक टाळण्यासाठी पुठ्ठा-निर्मित ‘anti-sex’ बेड्स दिले जाणार आहेत असं पॉल चेलीमोने ऑफिशल अकाउंटवरून ट्विट करत नेटिझन्सला माहिती दिली आहे. पॉल चेलीमोने त्यांच्या ट्विटर थ्रेडमध्ये याला जवळीक टाळण्याच्या उद्देशाने हा विचित्र झोपेच्या सेटअप बनवला असल्याचा विनोद केला आहे. यावर नेटिझन्सनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे आणि बर्‍याचजण या गोष्टीला विचित्र असं म्हणत आहेत. तर काहींनी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक जपानमधील कोविड१९ केसेस वाढल्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देत आहेत. म्हणूनच या बेड्सची स्थापना केली जात आहे.

काय आहे नक्की ट्विट?

टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बसविण्यात येणाऱ्या बेड्स पुठ्ठ्यापासून बनवले जातील, अ‍ॅथलीट्समधील जवळीक टाळणे हे उद्दीष्ट आहे. खेळापलीकडे असलेल्या परिस्थिती टाळण्यासाठी बेड्स एकाच व्यक्तीचे वजन सहन करण्यास सक्षम असतील.बेड्सचे चित्र शेअर करताना पॉल चेलीमोने त्यांच्या ट्विटर लिहिले. याचं ट्विटच्या थ्रेडमध्ये तो पुढे लिहतो “या क्षणी मला खाली जमिनीवर झोपायचं कसे याचा सराव करावा लागेल; कारण जर माझा बेड कोसळला तर मला जमिनीवर झोपायचं कसं याचं प्रशिक्षण नाही.

नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया!

चेलीमोच्या ट्विटने लवकरच नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. त्यांना या विचित्र संकल्पनेमुळे आश्चर्य वाटले. काहींनी तर याला अ‍ॅथलीट्सना कोविड-१९ चा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी हे बेड्सआ आहेत असं म्हंटल. ‘हे मूर्खपणाच आहे. ते प्रौढ आहेत जे त्यांना हवं ते करू शकतात. शिवाय कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला खरोखरच या सर्व गोष्टींचा सामना करावा लागणार असेल तर आपल्याकडे गेम्स का आहेत?’ अशी एकाने प्रतिक्रिया नोंदवली काहींनी या कल्पनेला पाठिंबा दर्शविला आणि ही संकल्पना योग्य आहे आणि पुनर्वापरयोग्य ऑलिम्पिक खेडे उभारण्याचा हा योग्य मार्ग आहे असेही कमेंट केले.

१६०,००० कंडोमसाठी चार कंपन्यांशी करार!

टोकियो २०२० च्या आयोजकांनी टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये खेळाडूंसाठी १६०,००० कंडोम देण्याच्या उद्देशाने चार कंडोम कंपन्यांशी करार केला आहे. आयोजकांनी रॉयटर्सला सांगितले की, कंडोम वाटप अ‍ॅथलीट्सच्या व्हिलेजमध्ये नाही तर आपल्या मायदेशी घेऊन जाण्यासाठी आहे. मायदेशी  अ‍ॅथलीट्सनी एचआयव्ही आणि एड्सबद्दल जागरुक करण्यासाठी हे कंडोम देण्यात येणार आहेत. 

खेळानंतर बेड्सचा पुनर्वापर

टोकियो गेम्सनंतर ह्या बेड्ससाठी वापरल्या गेलेल्या पुठ्ठ्याचा कागदाच्या उत्पादनांमध्ये पुनर्वापर करण्यात येणार आहे. हे बेड्स २०० किलोग्रॅम वजनाचा भार पेलू शकतात असे सांगितले जात आहे. जानेवारी २०२० मध्ये प्रथम हे बेड्स बनवले गेले. सामाजिक अंतराच्या कल्पनेला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.