Shocking viral video: आजकाल चोरीचे प्रकार जास्तच वाढले आहेत. दिवसाढवळ्या गर्दीच्या भागातसुद्धा चोर न घाबरता चोरी करायला मागे पुढे बघत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून समोर आली आहे. ग्राहक बनून आलेल्या एका चोरट्याने अवघ्या काही सेकंदात सोन्याच्या दुकानातून लाखोंचे दागिने लंपास केले.

ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादित नसून, लहान व्यापाऱ्यांना होणारे नुकसान आणि त्यांची सुरक्षा यावर निर्माण झाली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा व्हिडीओ भिवंडीतील नारपोली परिसरात असलेल्या एका सोन्याच्या दुकानातील आहे.दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू असताना एक व्यक्ती ग्राहक बनून दुकानात प्रवेश करते.

तो शांतपणे दागिने पाहतो, दुकानदाराशी बोलतो आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे जाते, तसे चोर चोरी करून पळतो. संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण व्यक्ती अगदी आत्मविश्वासात दुकानात येते. ती स्वतःला ग्राहक असल्याचं भासवते.

पाहा व्हिडिओ

दुकानदार त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवत असतो आणि दागिन्यांनी भरलेला ट्रे काऊंटरवर ठेवलेला असतो. काही क्षणांतच, दुकानदाराचं लक्ष थोडंसं हटतं आणि तो चोर संपूर्ण ट्रे उचलतो आणि दुकानातून पळून जातो. हा सगळा प्रकार इतक्या झपाट्याने घडतो की, दुकानातील कर्मचारी काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत.

चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे २.४ लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहता हा प्रकार आधीपासूनच ठरवलेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेक जण म्हणत आहेत की, “अवघ्या काही सेकंदात सगळं साफ केलं, ही तर फिल्मी स्टाईल चोरी आहे.”

काहींनी पोलिसांनी याकडे अधिक लक्ष्य देण्याची मागणी केली आहे, तर काही व्यापाऱ्यांनी सोन्याच्या दुकानांत अधिक कडक सुरक्षा व्यवस्था असावी असं मत मांडलं आहे.