जगातल्या सर्वात सुखी प्राण्यासोबत रमला टेनिसचा बादशाहा फेडरर

रॉजरला जगातील सर्वात सुखी प्राणी सापडला

‘जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे’ थोडक्यात काय तर जगात ‘सुखी’ प्राणी आपल्याला शोधून सापडायचा नाही. पण टेनिसचा बादशाहा रॉजरला मात्र जगातला सर्वात सुखी प्राणी शोधून सापडला आहे. आता हा सुखी प्राणी सापडल्यावर त्याच्यासोबत सेल्फी वगैरे घेण्याचा मोह त्याला झाला नाही तर नवलच. तेव्हा सध्या रॉजर फेडररचा जगातील सर्वात सुखी प्राण्यासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजतोय.

रॉजरच्या सेल्फीमध्ये दिसणाऱ्या प्राण्याचं नाव आहे क्वोका quokka. तो ऑस्ट्रेलियाच्या रॉटनेस्ट आयलंडवर आढळतो. साधरण प्राणी हे माणसांना बघून पळतात किंवा घाबरतात. पण, क्वोका मात्र माणसांना अजिबात घाबरत नाही. उलट माणसांविषयी त्यांना विशेष कुतूहल असतं तेव्हा, माणसांना अधिक जाणून घेण्यासाठी अनेकदा हे प्राणी अगदी बिंधास्तपणे माणसांच्या अगदी जवळ येतात. त्यांच्या या मनमिळावू स्वभावामुळे त्यांना जगातील सर्वात आनंदी, सुखी प्राण्यांची उपाधी दिली आहे.

रॉजरचे क्वोकासोबतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Roger federers selfie with worlds happiest animal quokkas

ताज्या बातम्या