scorecardresearch

Premium

क्षणात होत्याच नव्हतं! रस्त्याने चालताना कोसळले घराचे छत; महिलेसह दोन मुले गंभीर जखमी; हृदयद्रावक घटनेचा Video व्हायरल

या ह्रदयद्रावक घटनेवर आता सोशल मीडियावरूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

roof collapse on woman 2 child walk in street in manimajra chandigarh watch hearttouching video
क्षणात होत्याच नव्हतं! रस्त्याने चालताना अचानक कोसळले घराचे छत; महिलेसह दोन मुलं गंभीर जखमी; ह्रदयद्रावक घटनेचा Video व्हायरल (photo – @Sahilrukhaya7 twitter)

चंदिगडमधील मनीमाजरा भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्याने जाताना अचानक एका घराच्या छताचा काही भाग रस्त्यावर जाणाऱ्या महिला आणि दोन मुलांच्या अंगावर कोसळला. त्यानंतर तिघेही मोठ्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. हा अपघात रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडीओ आता काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मनीमाजरा भागात एक जुने घर पाडले जात असताना ही दुर्घटना घडली. घर पाडणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावर धोक्याचा इशारा फलकही लावला नव्हता; ज्यामुळे लोकांची ये-जाही सुरूच होती. अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराचे पाडकाम सुरू असताना एक महिला आणि दोन शाळकरी मुले रस्त्याने जात होती. त्याच वेळी अचानक घराच्या छताचा काही भाग कोसळून त्यावेळी गल्लीतून जाणाऱ्या महिला आणि तिच्या दोन मुलांच्या अंगावर पडला. यावेळी महिला आणि दोन मुले छताचा ढिगाऱ्याखाली गाडले गेली. या अपघातात ठेकेदाराचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या ह्रदयद्रावक घटनेवर आता सोशल मीडियावरूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Man Provokes Elephant With Stick Receives Instant Karma IFC Officer Shared Viral Video
कर्माचे फळ! हत्तीला काठीने हुसकावणे व्यक्तीला पडले महागात; हत्तीने कशी घडवली त्याला अद्दल, पाहा Video
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
Womens Health is there possible to normal delivery after one seizure
स्त्री आरोग्य : एकदा ‘सिझर’ झाल्यावर दुसऱ्यावेळी नॉर्मल प्रसूती होते का?
Ulta-Chashma
उलटा चष्मा: एका ‘न झालेल्या’मृत्यूची मृत्युघंटा..

ढिगाऱ्याचा मोठा भाग महिलेच्या अंगावर पडला असून, तिची प्रकृती गंभीर आहे. त्यांना चंदिगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मुलांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांनाही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी घरमालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातासंबंधीचा तपास करण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Roof collapse on woman 2 child walk in street in manimajra chandigarh watch heart touching video sjr

First published on: 09-12-2023 at 11:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×