आजकाल सर्वत्र हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. फक्त जेष्ठ व्यक्तीच नाही तर तरुण मंडळी देखील या आजाराचे शिकार होत आहेत. एखाद्या व्यक्तीला जर अचानक छातीत तीव्र वेदना सूरू झाल्या तर अशावेळी नेमकं काय करायचं हे सुचत नाही आणि हॉस्पिटलला नेण्यास जरा जरी उशीर झाला तर त्या व्यक्तीचा प्राण जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काही सेकंदाच्या या अवधीमध्ये काहीही होऊ शकते. या प्रसंगाचा विचार केला तरी आपण काळजीत पडतो. असाच एक प्रसंग काही दिवसांपुर्वी मथुरा रेल्वे स्थानकावर घडला. या घटनेचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२२ रोजी ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्या एका प्रवाशाला मथुरा रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. तेव्हा तिथे ड्युटीवर असणाऱ्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत त्या प्रवाशाचा सीपीआर करून जीव वाचवला. त्यानंतर या प्रवाशाला दवाखान्यात नेण्यात आले.

आणखी वाचा : फ्रिज नसला तरी दूध नासण्याचं टेन्शन नाही! IAS अधिकाऱ्याने स्वतःच्या गावच्या घरातील भन्नाट जुगाडाचे फोटो केले शेअर

रेल्वे मंत्रालयाचे ट्वीट :

आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचा जीव वाचला. अनेक जणांनी या ट्वीटवर कमेंट करत आरपीएफ जवानाचे कौतुक केले आहे. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpf jawan saves life by performing cpr on passenger suffering from heart attack photos went viral pns
First published on: 05-10-2022 at 19:20 IST