RPF जवानाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर निराधार वृद्धांची सेवा करून जिंकलं मन; फोटो व्हायरल

आरपीएफ जवान बिहारच्या जमालपूर रेल्वे स्टेशनवर वृद्ध व्यक्तीला आंघोळ करण्यास, कपडे घालण्यास मदत करताना दिसले.

rpf jawanhelps old age
हा फोटो व्हायरल झाला आहे (फोटो:@RPF_INDIA/Twitter)

बिहारमधील सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, एक आरपीएफ जवान रेल्वे स्टेशनवर पडलेल्या असहाय आणि लावारिस वृद्ध लोकांची सेवा करताना दिसत आहे. आरपीएफ जवान स्वतः या व्यक्तीला हाताने अंघोळ घालतात आणि नंतर त्यांना कपडेही घालतात. या व्हिडीओमध्ये पोलिसांचे वेगळे रूप दिसत आहे.

जेव्हा या व्हायरल व्हिडीओची चौकशी करण्यात आली तेव्हा हा व्हिडीओ मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर रेल्वे स्टेशनचा असल्याचे समोर आले, तर व्हिडीओमध्ये मदत करणारी व्यक्ती रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) जवान असल्याचे समजत आहे. ज्या वृद्धाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली आणि घराबाहेर काढले त्या वृद्धाला आरपीएफ जवानाने नीट संभाळले.

वास्तविक, एक वृद्ध माणूस गेल्या तीन महिन्यांपासून स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर राहत होता. लखीसराय जिल्ह्यातील सूर्यगृहात राहणाऱ्या या वयोवृद्धाला नातेवाईकांनी त्यांना हाकलून लावले. कसा तरी वृद्धांनी स्टेशन प्लॅटफॉर्मवर आश्रय घेतला. वृद्धाची प्रकृती खालावत चालली होती आणि त्याचे शरीर अंघोळ न केल्यामुळे स्वच्छही न्हवते. यादरम्यान, जमालपूर आरपीएफमध्ये तैनात हेड कॉन्स्टेबल अनुराग कुमार, प्लॅटफॉर्मवर त्याच्या ड्युटीवर तैनात असताना, त्यांना ते दिसले. वृद्धांना खाण्यापिण्याची सोय केली जात होती, पण त्यानंतर आरपीएफ जवानाने स्वतः आंघोळही घातली आणि त्याचे मलमूत्रही साफ केले.

आरपीएफ जवान अनुराग यांनी वृद्धांना आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कपडेही घातले. इतर सैनिक आणि प्रवाशांनीही त्यांना या कामात मदत केली. आरपीएफ जवान अनुरागचे हे उदात्त पाऊल पाहून प्रवासी आणि लोकही कौतुक करत होते. अनुराग यांनी वृद्धांना मदत केल्याचा हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

तुम्हाला काय वाटत आरपीएफ जवान अनुराग यांच्या कामाबद्दल?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rpf jawans win hearts by serving destitute elderly on bihars jamalpur railway platforms photo viral ttg

फोटो गॅलरी