भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी पादचारी पुल बांधण्यात आले असतानाही काही प्रवासी जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळ ओलांडतात. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रेनचा अंदाज न आल्याने अनेकांना प्राणही गमवावं लागलं आहे. रेल्वे रुळ ओलांडून मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या प्रवशांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मध्य प्रदेशच्या होसंगाबाद या स्थानकावरील अशीच एक थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन वृद्ध महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरून भरभाव वेगानं ट्रेन येत असते. पण स्थानकात ड्यूटीवर असणाऱ्या एका आरपीएफ जवानाला महिला रेल्वे रुळ ओलांडत असल्याचं दिसतं. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कर्तव्यदक्ष आरपीएफ त्या दोन महिलांना हाताने पकडून तातडीनं रेल्वे स्थानकावर खेचतो. हा संपूर्ण थरार व्हिडीओच्या माध्यमातून आला असून महिलांचा जीव वाचवणाऱ्या आरपीएफचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

रल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना मोठं आवाहन

या घटनेचा व्हिडीओ रेल्वे मंत्रालयाकडून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना आवाहन केलं आहे, “सर्वांसाठी सुरक्षाच महत्वाची! मध्य प्रदेशच्या होशंगाबाद रेल्वे स्टेशनवर सतर्क असणाऱ्या आरपीएफ जवानाने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांचा जीव वाचवला. एक प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी नेहमीच पादचारी पुलाचा वापर करा.” असं ट्विट रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वेच्या नियमांचं उल्लंघन न करण्याच्या सूचना रेल्वेकडून प्रवशांना सातत्याने दिल्या जातात. पण काही प्रवासी नियम मोडून आपला जीव धोक्यात टाकत असतात.

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत जवळपास ५३ हजार व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत म्हटलंय, त्यांना मोठा दंड लावा, हे सहन केलं जाऊ शकत नाही. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना फलकावर लावा.” दुसऱ्या नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “चांगला प्रयत्न”. तसंच अन्य एक नेटकरी म्हणाला, “कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान करा.”