“बेटी पटाओ?, आज पुन्हा एकदा टेलिप्रॉम्टरने विश्वासघात केला की काय?”

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचं नाव घेताना पंतप्रधानांनी ‘बेटी बचाव, बेटी पटाओ,’ असं म्हटलं.

pm modi saying beti bachao beti patao
पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणातील व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय (फोटो ट्विटरवरुन साभार)

ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भाषणादरम्यान एक मोठी चूक झाली. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदींनी महिला शिक्षणासंदर्भातील विषयांबरोबरच महिलांबद्दलच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र या संबोधनादरम्यान मोदींनी मुलीसंदर्भातील सरकारी योजनेचं नावच चुकवलं.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाओ,’ म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमामध्ये लोकांना संबोधित करताना एका सरकारी योजनेचं नाव चुकीचं घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यातच या चुकीमुळे या वाक्याच अर्थच बदलल्याची टीकाही होतेय. अशाच एका माजी आयएअस अधिकाऱ्यानेही पंतप्रधानांना हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत टोला लगावला आहे.

नेमकं घडलं काय?
मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार करत असलेलं काम आणि सरकारी योजनांबद्दल बोलताना पंतप्रधानांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणेचा संदर्भ द्यायचा होता. मात्र, बोलताना ते ‘पढाओ’ शब्द चुकीचा बोलले आणि त्यामुळे घोषणेचा पूर्ण अर्थ बदलला आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या यशाबद्दल सांगत होते. समोर आलेल्या आकडेवारीमधून ही योजना यशस्वी असल्याचं स्पष्ट झालंय सांगताना पंतप्रधानांच्या तोंडून योजनेचं नाव ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाओ,’ असं निघालं.

नक्की पाहा >> पंतप्रधान मोदी तर कालकेयची भाषा बोलू लागले, PM प्रॉम्टरजीवी निघाले; मोदींचा गोंधळ उडल्यानंतर Memes झाले Viral

माजी आयएएस अधिकाऱ्याचा टोला
माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या सूर्य प्रताप सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत काही दिवसांपूर्वी घडलेल्या टेलिप्रॉम्टर प्रकरणाची आठवण करुन दिलीय. “बेटी पटाओ?, आज पुन्हा एकदा टेलिप्रॉम्टरने विश्वासघात केला की काय?”, अशा खोचक कॅप्शनसहीत सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे सूर्य प्रताप सिंह हे त्यांच्या भाजपाविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी करोना व्यवस्थापनावरुन अनेकदा उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला धारेवर धरलं आहे.

टेलिप्रॉम्टर संबंध काय?
सूर्य प्रताप सिंह यांनी टेलिप्रॉम्टरचा उल्लेख करण्यामागील कारण म्हणजे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण देताना पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडाला होता.

नक्की वाचा >> टेलिप्रॉम्टर बंद पडून PM मोदी भाषणादरम्यान अडळल्यानंतर राहुल गांधींचा टोला; म्हणतात, “एवढं खोटं तर…”

टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने मोदी गोंधळून गेल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलेला. आजही अशाच प्रकारे टेलिप्रॉम्टरने विश्वासघात केल्याने मोदींचा गोंधळ झाला का असा सूर्य प्रताप सिंह यांच्या टिकेचा रोख आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rtd ias officer surya pratap singh slams pm modi for saying beti bachao beti patao modi instead of saying padhao scsg

Next Story
जिराफची शिकार करण्यासाठी सिंहांचा सापळा; पण झालं असं की तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी