सध्याच्या महागाईच्या काळामध्ये फळं खाण्याआधी आणि विकत घेण्यासाठी त्यांचा दर्जा आणि किंमत तपासून पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसतं. असं असतानाच आम्ही आज तुम्हाला असा एका फळाबद्दल सांगणार आहोत जे जगातील सर्वात महागड्या फळांपैकी एक आहे. खरं तर हा एक द्राक्षांचा प्रकार आहे. या द्राक्षांचा एक घड तब्बल ३० ते २५ हजारांना विकला जातो. आता एवढं महाग फळं तर थेट बाजारात विकलं जाणार नाही. हे फळ विकताना लिलाव केला जातो. जो जास्त पैसे मोजणार त्याला फळं विकली जाणार असा सरळ हिशोब.

या खास द्राक्षांना रुबी रोमन नावाने ओळखलं जातं. या द्राक्षांच्या चवीसमोर आपल्याकडे खाल्ली जातात ती हिरवी आणि काळी द्राक्षं काहीच नाहीत. खास करुन जापानमध्ये या द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. या द्राक्षांचा आकार हा सामन्य द्राक्षांपेक्षा फारच मोठा असतो. तसेच ही द्राक्षं चवीला फार गोड असतात. विशेष म्हणजे जापानमध्ये सुद्धा इशिकावा प्री फ्रेक्चरल या एकमेव कंपनीकडून या द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. ही द्राक्षं म्हणजे प्रिमियम प्रोडक्टसारखी असल्याने त्यांना मागणी असली तरी त्यांचं उत्पादन मर्यादित असल्याने त्यांना एवढा भाव आहे.

आता ही द्राक्षं इतकी खास आहेत तर त्यांचा दरही तेवढाच खास आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही द्राक्षं बाराजामध्ये विकत मिळत नाहीत. त्यांचा विशिष्ट पद्धतीने लिलाव केला जातो असं बिझनेस इन्सायडरच्या वृत्तात म्हटलं आहे. सामान्यपणे एक हजार डॉलर म्हणजे ७० हजारांपर्यंत वगैरे या द्राक्षांचा मोठा घड विकत घेता येतो. मात्र २०२० साली एका लिलावामध्ये या द्राक्षांच्या एका घडासाठी तब्बल १२ हजार अमेरिकन डॉलर म्हणझेच जवळजवळ ८.८ लाख रुपयांची बोली लावण्यात आलेली. त्यातही अनेकदा या घडांमधील द्राक्षांची संख्या ठरलेली असते. आता सर्व हिशोब लावल्यास काही घडांना मिळणाऱ्या दरानुसार एका द्राक्षाची किंमत ही ३० हजार रुपयांपर्यंतही असते. या किंमतींवरुन सोशल नेटवर्किंगवर चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.

मला द्राक्षं आवडतात पण…

फारच किंमत आहे

मी एकटाच आहे का ज्याला…

कितीही चांगली असली तरी

असाही विचार

एवढे पैसे कधीच देणार नाही

जेव्हा तुम्ही हे द्राक्ष खाता

इतर फळांच्या किंमतीही डोळे चक्रावणाऱ्या

केवळ द्राक्षंचं नाही तर जपानमध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या इतर फळांच्या किंमतीही महागड्या गटात मोडणाऱ्याच आहे. मागील काही वर्षांमध्ये जगातील सर्वात महागाड्या आंब्यांमध्ये समावेश झालेला जपानी मियाजाकी आंबा हे अशाच एका महागड्या फळाचं उदाहरण आहे. लाल रंगाचा हा अंबा प्रती किलो अडीच लाख रुपयांना विकला जातो. जपानमधील चौकोनी आकाराची कलिंगड सुद्धा प्रचंड लोकप्रिय आहेत. या कलिंगडांची किंमत ६० हजार रुपयांपर्यंत असते. याच देशात उत्पादन घेतली जाणारी सेंबेकिया स्ट्रॉबेरी एका डझनला सहा हजार रुपये दराने विकली जाते.