scorecardresearch

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्यासाठी चक्क धावत्या ट्रेनमध्ये मारल्या पुश-अप्स, धावपटूंचा Video व्हायरल

चक्क धावत्या ट्रेनमध्ये मारल्या पुश-अप्स, धावपटूंच्या स्टंटबाजीचा Video व्हायरल

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्यासाठी चक्क धावत्या ट्रेनमध्ये मारल्या पुश-अप्स, धावपटूंचा Video व्हायरल
धावत्या ट्रेनमध्ये व्यायाम केल्याचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Twitter(

TATA Mumbai Marathon Viral Video : मुंबईत होणाऱ्या मॅरेथॉनच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी शेकडो धावपटू दरवर्षी कंबर कसत असतात. मुंबई मॅरोथन स्पर्धेत भाग घेण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर धावण्याचा सराव करत असतात. मुंबईतील नावाजलेल्या स्पर्धांपैकी एक अशी मुंबई मॅरोथॉनची ख्याती आहे. पीळदार शरीरयष्टी करण्यासाठी तसेच आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मुंबईतील नागरिक या स्पर्धेत मोठ्या संख्येत सहभागी होतात. पण काही जण स्पर्धेत जिंकण्यासाठी जीवघेणा व्यायाम करायलाही घाबरत नाहीत. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत जिंकण्यासाठी काही तरुणांनी चक्क धावत्या ट्रेनमध्येच व्यायाम केला. ट्रेन वेगानं जात असतानाही दोन पठ्ठ्यांनी पुश-अप्स मारायला सुरुवात केली.

मुंबईच्या ट्रेनमध्ये दरवाज्यातच धावपटूंचा जीवघेणा व्यायाम, थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

टाटा मुंबई मॅरेथॉनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा थरारक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दोन तरुण धावत्या लोकलमध्ये जीवघेण्या पुश-अप्स मारताना या व्हिडीओत दिसत आहेत. ‘ट्रेनिंग इन फुल स्विंग’ असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सहा कॅटेगरीत तब्बल ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी २०२३ च्या या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. मुंबईत मॅरेथॉन स्पर्धा असल्यावर अनेक धावपटू कसदार व्यायाम आणि सकस आहार फॉलो करताना दिसतात. मॅरेथॉनची क्रेझ दिवसेंदिस वाढत असून मोठ्या अबालवृद्धांसह तरुण पिढी या स्पर्धेत सहभागी होताना दिसत आहे.

नक्की वाचा – नवऱ्याला पाहून नवरी लाजली, वेडिंग शूटचा Video व्हायरल, नेटकरी म्हणाले, “सरकारी नोकरीची ताकद”

इथे पाहा व्हिडीओ

मॅरेथॉनच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी सर्वच जण धावण्याचा सरावात घाम गाळत असतात. पण स्पर्धेत कधी कुणी जिंकतं, तर कधी पराभव होतो. पण ही स्पर्धा जिंकण्यासाठी विनाशकाले विपरीत बुद्धीनं व्यायाम करणं जीवघेणं ठरु शकतं. दोन तरुणांनी चक्क धावत्या ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ व्यायाम करुन आपला जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून तरुणांना चांगलच सुनावलं आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी नियमांचे पालन करुनच त्या स्पर्धेत सहभागी व्हावं, असं आवाहन नेटकरी स्पर्धकांना करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 10:27 IST

संबंधित बातम्या